इस्लामपुरात पक्या पुजारीसह साथीदारास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:10 IST2021-01-13T05:10:57+5:302021-01-13T05:10:57+5:30

फोटो- १२०१२०२१-बबल्या पवार लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : येथील औद्योगिक वसाहतीतील हॉटेलमध्ये पाच दिवसांपूर्वी मद्यपान केल्यानंतर हॉटेल चालकास तलवारीचा ...

Accompanied by a priest in Islampur | इस्लामपुरात पक्या पुजारीसह साथीदारास अटक

इस्लामपुरात पक्या पुजारीसह साथीदारास अटक

फोटो- १२०१२०२१-बबल्या पवार

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : येथील औद्योगिक वसाहतीतील हॉटेलमध्ये पाच दिवसांपूर्वी मद्यपान केल्यानंतर हॉटेल चालकास तलवारीचा धाक दाखवत रोकड लुटणाऱ्या पक्या पुजारी टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली. प्रकाश ऊर्फ पक्या महादेव पुजारी (वय २५, रा. दूध संघाच्या पाठीमागे) आणि विकास ऊर्फ बबल्या धोंडीराम पवार-कुकडे (२६, रा. मंत्री कॉलनी, इस्लामपूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांचा तिसरा साथीदार बिरू मोटे फरार आहे.

औद्योगिक वसाहतीमधील अमोल दिनकर पाटील (रा. साखराळे) यांच्या हॉटेलमध्ये ८ जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास मद्यपान करून पुजारी टोळीने धिंगाणा घातला होता. पाटील यांनी दंगा करू नका, अशी समज दिल्याचा राग आल्याने हॉटेलमधील साहित्याची नासधूस व तोडफोड करून ६० हजार रुपयांचे नुकसान केले. त्यानंतर दुचाकीला लावलेली तलवार काढत पुजारीने दहशत माजवली. हॉटेलच्या कॅश काउंटरमधील २४०० रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेत प्रत्येक महिन्याला दोन हजारांचा हप्ता द्यायचा, नाहीतर जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देत पाटील यांना मारहाण केली होती. सहायक पोलीस निरीक्षक गणेशप्रसाद भारते अधिक तपास करीत आहेत.

चौकट

पुजारी टोळी कारवाईच्या रडारवर

इस्लामपूर पोलिसांनी शहर आणि परिसरासह कार्यक्षेत्रातील सर्वच फाळकुटदादांचा बीमोड करण्याचे सत्र अवलंबले आहे. आतापर्यंत उपविभागातील सहा टोळ्यांमधील ३७ जणांवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. पक्या पुजारी टोेळीसुद्धा आता अशाच कारवाईच्या रडारवर आहे. तेव्हापासून पुजारी साथीदारांसह फरारी होता. या दोघांना येथील न्यायालयाने १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Web Title: Accompanied by a priest in Islampur