खानापुरातील तरुणाचा पुण्यात अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:20 IST2021-01-10T04:20:00+5:302021-01-10T04:20:00+5:30
सागर जोशी हे पंधरा वर्षांपासून व्यवसायानिमित्त पुणे येथे स्थायिक झाले होते. ते शुक्रवारी औरंगाबाद येथे मित्राच्या विवाहासाठी गेले होते. ...

खानापुरातील तरुणाचा पुण्यात अपघाती मृत्यू
सागर जोशी हे पंधरा वर्षांपासून व्यवसायानिमित्त पुणे येथे स्थायिक झाले होते. ते शुक्रवारी औरंगाबाद येथे मित्राच्या विवाहासाठी गेले होते. शुक्रवारी रात्री औरंगाबादहून पुण्याकडे मोटारीने (क्र. एमएच १० सी.जी. ००११) येत असताना शिरूरजवळ अपघात झाला. जोशी यांच्या कारने कारपुढे असणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. यामध्ये कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. अपघातात सागर जोशी यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची बातमी शनिवारी सकाळी खानापूर येथे समजल्यावर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सागर यांच्या मृतदेहावर शनिवारी रात्री नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजय, पुतण्या असा परिवार आहे.
फोटो-०९सागर जोशी
फोटो-०९खानापूर१