सांगली : येथील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाला समांतर बांधलेल्या नवीन पुलाचा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी तासाभरात मोटारीचा अपघात झाला. पुलावरील पदपथाच्या बाजूला असणाऱ्या कठड्याला मोटार धडकून कठड्याचा कोपरा फुटला. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी झाली होती.आयर्विन पुलाला समांतर पूल उभारण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू होते. नवीन पुलाचे काम सुरू करण्यापूर्वीच आयर्विन पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. नवीन पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर किरकोळ काम बाकी असल्यामुळे पुलाच्या उद्घाटनाचे काम रेंगाळले होते. गुरुवारी सायंकाळी पुलाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर नवीन पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.उद्घाटनंतर तासाभरात पुलावर वर्दळ दिसू लागली. एक वृद्ध मोटार (एमएच १० इए ४२४०) घेऊन जात होते. त्यांना पदपथाशेजारी असणाऱ्या छोट्या कठड्याचा अंदाज आला नाही. तसेच अंधार असल्याने मोटार कठड्याच्या कोपऱ्याला धडकली. त्यामुळे कठड्याचा कोपरा फुटला. मोटारीचे किरकोळ नुकसान झाले. सुदैवाने चालवणाऱ्या वृद्धास दुखापत झाली नाही. मात्र, उद्घाटनानंतर तासाभरातच अपघात झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू होती. तत्काळ क्रेन मागवून मोटार उचलून नेण्यात आली.
Web Summary : A car crashed into a railing on Sangli's new bridge just an hour after its inauguration. The incident, which damaged the railing and the car, fortunately left the elderly driver unharmed. The accident has ignited local discussion.
Web Summary : सांगली में नए पुल के उद्घाटन के सिर्फ एक घंटे बाद एक कार रेलिंग से टकरा गई। घटना में रेलिंग और कार क्षतिग्रस्त हो गई, लेकिन सौभाग्य से बुजुर्ग चालक सुरक्षित है। दुर्घटना ने स्थानीय चर्चा को जन्म दिया है।