सांगलीवाडीमध्ये अपघात; एक ठार

By Admin | Updated: May 26, 2014 01:17 IST2014-05-26T00:42:59+5:302014-05-26T01:17:34+5:30

भरधाव मोटारी पाठीमागून धडक

Accident in Sangliwadi; One killed | सांगलीवाडीमध्ये अपघात; एक ठार

सांगलीवाडीमध्ये अपघात; एक ठार

सांगली : भरधाव मोटारीने पाठीमागून धडक दिल्याने मंचूर (जि. सोलापूर) येथील नानासाहेब मधुकर डोके (वय ५०) हे सायकलस्वार ठार झाले. सांगलीवाडीतील यश ढाब्यासमोर आज (रविवार) सकाळी हा अपघात झाला. डोके सांगलीवाडीतील लक्ष्मी फाट्यावर राहतात. ते सायकलवरुन सांगलीवाडीतील टोल नाक्यावर येत होते. त्यावेळी सांगलीकडे भरधाव वेगाने येणार्‍या मोटारीने (क्र. एमएच-१२. ईटी. ११०६) त्यांना धडक दिली. यामध्ये ते सायकलसह रस्त्यावर उडून पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. त्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी ते मृत झाल्याचे घोषित केले. विच्छेदन तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. अपघातग्रस्त मोटार पोलिसांनी जप्त केली असून, ती पुण्याची आहे. वाहनचालकाविरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता. डोके कुटुंबासह शेजात मजुरी करत होते. (प्रतिनिधी)

Web Title: Accident in Sangliwadi; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.