गणपतीपुळे मार्गावर अपघात, पलूसचे दोघे गंभीर

By Admin | Updated: July 16, 2014 01:24 IST2014-07-16T01:08:49+5:302014-07-16T01:24:38+5:30

जाकादेवी फाट्यावर अपघात

Accident on Ganapatipule road, both of the palus are serious | गणपतीपुळे मार्गावर अपघात, पलूसचे दोघे गंभीर

गणपतीपुळे मार्गावर अपघात, पलूसचे दोघे गंभीर

रत्नागिरी : अंगारकी संकष्टीनिमित्त पलूस, सांगली येथून गणपतीपुळेला गणेश दर्शनास जाताना दुचाकीला बोलेरो गाडीने जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. संजय शंकर जाधव (३५) व उत्तमेश यशवंत जाधव, बुरूंगवाडी, ता, पलूस अशी त्यांची नावे आहेत. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जाकादेवी फाट्यावर आज (मंगळवार) दुपारी हा अपघात घडला.
जखमी संजय जाधव हे एमएसईबीचे ठेकेदार आहेत. उत्तमेश जाधव हा शेती करतो. संजय जाधव उत्तमेशसह दुचाकीवरून गणपतीपुळेकडे बुरूंगवाडी येथून सकाळी ७ वाजता निघाले होते. संजय जाधव यांचे चुलत बंधू संतोष यशवंत जाधव व नीलेश जाधव हे दुसऱ्या दुचाकीने त्यांच्या मागूनच गणपतीपुळेकडे निघाले होते. अपघातानंतर काही क्षणातच ते घटनास्थळी पोहोचले. बोेलेरोतील १० ते १२ जण बोलेरो गाडी तेथेच सोडून पळून गेले. (प्रतिनिधी)

Web Title: Accident on Ganapatipule road, both of the palus are serious