शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश खाडे म्हणतात, भाजपवर आता सगळेच भाळले आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 15:24 IST

सांगली जिल्ह्यातील भाजप भक्कम स्थितीत असून, आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही प्रत्येक मतदारसंघात सक्षम उमेदवार आहेत. अशा परिस्थितीत भाजपात येऊ इच्छिणाऱ्यांना आम्ही येऊ नका म्हणणार नाही. ते पक्षात येतील आणि बसतील. भाजपवर आता सगळेच भाळले आहेत, त्यामुळे प्रवेश करत असल्याचेही ते म्हणाले.

ठळक मुद्देभाजपात सर्वांना प्रवेश; पण आमदारकीचा शब्द नाहीसुरेश खाडे म्हणतात, भाजपवर आता सगळेच भाळले आहेत

सांगली : जिल्ह्यातील भाजप भक्कम स्थितीत असून, आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही प्रत्येक मतदारसंघात सक्षम उमेदवार आहेत. अशा परिस्थितीत भाजपात येऊ इच्छिणाऱ्यांना आम्ही येऊ नका म्हणणार नाही. ते पक्षात येतील आणि बसतील.

नव्याने पक्षात येणाऱ्यांमुळे जून्या नेत्यांना अडचण होईल, असे वातावरण नसून पक्षात येणाऱ्या सर्वांना आमदार केलेच पाहिजे, असा कुठला नियम नाही, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. दरम्यान, भाजपवर आता सगळेच भाळले आहेत, त्यामुळे प्रवेश करत असल्याचेही ते म्हणाले.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षाची माहिती देण्यासाठी सांगलीत आयोजित पत्रकार बैठकीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आगामी विधानसभा निवडणुका व पक्षातील इनकमिंगवर भाष्य केले.खाडे म्हणाले, सर्वसामान्य जनतेच्या मनातच भाजप पक्ष रूजल्याने संपूर्ण राज्यात अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. सांगली जिल्ह्यातील भाजपचा विचार करता, अगोदरच पक्ष भक्कम झाला आहे. लोकसभा, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत हे स्पष्ट झाले आहेच. तरीही पक्षात कोण येत असेल तर त्यांचे स्वागतच केले जाईल.

टॅग्स :BJPभाजपाSangliसांगली