जत तालुक्यात बेदाणा निर्मितीने अर्थकारणाला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:26 IST2021-05-19T04:26:28+5:302021-05-19T04:26:28+5:30
फोटो ओळ : जत तालुक्यातील पूर्व भागातील उभारलेल्या बेदाणा शेडमुळे रोजगार निर्मिती होत आहे. लोकमत न्यूज नेटवर्क संख : ...

जत तालुक्यात बेदाणा निर्मितीने अर्थकारणाला गती
फोटो ओळ : जत तालुक्यातील पूर्व भागातील उभारलेल्या बेदाणा शेडमुळे रोजगार निर्मिती होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : जत तालुक्यात बेदाणा निर्मितीस पोषक वातावरणामुळे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण उत्कृष्ट बेदाणानिर्मिती या पट्ट्यामध्ये होते आहे. त्यामुळे बेदाणा निर्मितीचे शेड उभा राहिले आहेत. बेदाणा निर्मितीचे नेटिंग मशीन उभारले गेले आहेत. बेदाणा निर्मिती शेड, नेटिंग मशीनमुळे दुष्काळातील मंदावलेल अर्थकारणचक्र गतीने फिरू लागले आहे.
तालुक्यात द्राक्षाचे क्षेत्र १० हजार ८७० एकर आहे. द्राक्ष पीक नगदी पीक म्हणून घेतले जाते. निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. बेदाण्याला चांगला दर मिळत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचे बेदाणा निर्मिती करण्याकडे कल वाढला आहे.
पूर्व भागातील उमदी, बेळोंडगी, निगडी बुद्रुक, बालगाव, सुसलाद, हळ्ळी, सुसलाद, सोनलगी सिद्धनाथ, जालिहाळ खुर्द, संख, जालिहाळ बुद्रुक, कोंतवबोबलाद, करजगी या भागात मोठ्या प्रमाणावर बेदाणा निर्मिती केली जाते.
ऐन लाॅकडाऊनच्या काळात महिला व पुरुषांना रोजगार उपलब्ध होतो. द्राक्ष काढणे, वाॅशिंग करणे, पॅकिंग करणे, रँकवर टाकणे, बेदाणा झाडणे अशा कामात रोजगार उपलब्ध होतो. बेदाणाचे उत्पादन सर्वच दृष्टीने खर्चिक असल्याने सवलतीच्या दरात औषधे, रँक उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
चाैकट
बेदाणा नेटिंग मशीन
बेदाणा करण्यासाठी नेटिंग मशीन आहेत. बेदाणा प्रक्रिया सुलभ झाली आहे. वेळ व श्रमात बचत झाली आहे. मशीनमध्ये बेदाणा प्रतवारी केली जाते. उमदी, संख, सिद्धनाथ, कागनरी, मुंचडी येथे बेदाणा नेटिंग मशीन आहेत.
चाैकट
शीतगृहासाठी प्रयत्न व्हावेत
बेदाणास देशाबरोबर परदेशात मोठी मागणी आहे. तालुक्यात बेदाण्याचे उत्पादन लक्षात घेता मार्केटिंगची सोय उपलब्ध करून दिल्यास फायदेशीर ठरणार आहे. सध्या शीतगृह (कोल्ड स्टोअरेज) तासगाव, सांगली येथे आहेत. हे अंतर लांब आहे. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात नजीक शीतगृह उभा करून दिल्यास वाहतुकीचा होणारा खर्च वाचणार आहे.