मांगले केंद्रात लसीकरणाला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:26 IST2021-04-25T04:26:19+5:302021-04-25T04:26:19+5:30
मांगले : जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मांगले प्राथमिक आरोग्य केद्रांतील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून, ...

मांगले केंद्रात लसीकरणाला वेग
मांगले : जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मांगले प्राथमिक आरोग्य केद्रांतील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून, सर्व उपाययोजना सुरू आहेत. दरम्यान, मांगले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लसीकरणाने वेग घेतला आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद आहे.
केंद्रातील ११ गावांत ४५ वर्षांवरील ४,८०३ नागरिकांचे लसीकरण झाले असून, त्याची टक्केवारी ७० टक्के आहे.
मांगले परिसरातील ११ गावात गतवेळेपेक्षा कोरोनाची संख्या कमी असली, तरी मांगले प्राथमिक आरोग्य केंद्राने चांगल्या उपाययोजना करून यंत्रणा सतर्क ठेवली आहे. मांगले आरोग्य केंद्रात कोविडच्या रुग्णासाठी चार बेड तयार आहेत, शिवाय कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध आहे. रुग्णाची लक्षणे दिसताच, त्यांची तपासणी करून उपचार केले जातात. मात्र, अपुरी लस, अपुरे कर्मचारी यामुळे समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, तरी त्वरित लस उपलब्ध करून द्यावी व तातडीने विविध रिक्त पदे भरावीत, अशी मागणी होत आहे.