सागावमध्ये कोरोना तपासण्यांचा वेग वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:20 IST2021-05-28T04:20:42+5:302021-05-28T04:20:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुनवत : सागाव (ता. शिराळा) येथील वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी कडक लॉकडाऊनबरोबरच आरोग्य यंत्रणेने कोरोना ...

सागावमध्ये कोरोना तपासण्यांचा वेग वाढवा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुनवत : सागाव (ता. शिराळा) येथील वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी कडक लॉकडाऊनबरोबरच आरोग्य यंत्रणेने कोरोना चाचणीचा वेग वाढवित पॉझिटिव्ह रुग्णांवर तत्काळ औषधोपचार चालू करून, मृत्यूदर रोखण्याच्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी स्थानिक प्रशासन व आरोग्य यंत्रणेला दिल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी गुरुवारी सागाव येथे भेट दिली. गावातील कोरोना स्थिती, उपचार, विलगीकरण आदी बाबींचा आढावा घेतला. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, सरपंच तात्या पाटील, उपसरपंच सत्यजित पाटील, ग्रामसेवक एम.आर. पाटील, तलाठी अनिल चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. बी. निर्मळे, डॉ. पी. एम. चिवटे उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी चौधरी यांनी विलगीकरणात असलेल्या रुग्णांची भेट घेऊन आरोग्य यंत्रणा राबवित असलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेतला. गावामध्ये कोरोना नियंत्रणासाठी काय उपाययोजना केल्या याबाबतही स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेतली.
यावेळी आरोग्य सेवक बी. बी. जाधव, पोलीस पाटील रूपाली तिके, जयसिंग पाटील, अविनाश फातले, दीपक जाधव, नीलेश साळुंखे, सचिन लोले, शिवाजी गोसावी, आनंदा आपटे, आनंदा पाटील, किरण पाटील आदी उपस्थित होते.