महाडिक अभियांत्रिकीची शैक्षणिक प्रगती गौरवास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:21 IST2021-01-09T04:21:33+5:302021-01-09T04:21:33+5:30

इस्लामपूर : पेठ नाका येथील श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रगती गौरवास्पद असून संस्थेच्या ...

The academic progress of Mahadik Engineering is glorious | महाडिक अभियांत्रिकीची शैक्षणिक प्रगती गौरवास्पद

महाडिक अभियांत्रिकीची शैक्षणिक प्रगती गौरवास्पद

इस्लामपूर : पेठ नाका येथील श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रगती गौरवास्पद असून संस्थेच्या दशकपूर्तीच्या प्रवासात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत मिळविलेले यश उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. आर. शास्त्री यांनी केले.

महाडिक संकुलातील श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेस डॉ. शास्त्री यांनी सदिच्छा भेट दिली. संस्थेचे सचिव राहुल महाडिक यांच्याहस्ते कुलगुरू डॉ. शास्त्री यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक प्रा. महेश जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण तंत्रशिक्षणाबरोबरच राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांविषयी समाधान व्यक्त करत, या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या राज्यातील प्रमुख महाविद्यालयांमध्ये एक अग्रेसर महाविद्यालय म्हणून या विद्यापीठाअंतर्गत समावेश होईल, असा विश्वास डॉ. शास्त्री यांनी व्यक्त केला.

राहुल महाडिक म्हणाले, तंत्रशिक्षणामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची भूमिका महत्त्वपूर्ण असून शैक्षणिक संस्थांच्या प्रगतीसाठी कुलगुरू शास्त्री यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

प्रा. महेश जोशी यांनी, संकुलाच्या विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा तसेच यशस्वी दशकपूर्तीचा आढावा घेतला. प्राचार्य डॉ. ए. ए. मिरजे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रीतल पाटील यांनी परिचय करून दिला. प्रा. मंगेश इंगवले यांनी आभार मानले.

फोटोओळी: ०८०१२०२१-आयएसएलएम-महाडिक न्यूज

फोटो ओळ :

पेठ नाका येथील महाडिक शैक्षणिक संकुलात कुलगुरू डॉ. व्ही. आर. शास्त्री यांचा सत्कार सचिव राहुल महाडिक यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी कार्यकारी संचालक प्रा. महेश जोशी, प्राचार्य डॉ. ए. ए. मिरजे उपस्थित होते.

Web Title: The academic progress of Mahadik Engineering is glorious