टाकळीत आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ; दोघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:32 IST2021-06-09T04:32:49+5:302021-06-09T04:32:49+5:30

कोरोना साथीदरम्यान ग्रामीण भागात आरोग्यसेविका व आशा वर्कर्स रुग्णांच्या तपासणीचे काम करत आहेत. रविवारी टाकळी येथे कोरोना पॉझिटिव्ह ...

Abusing health workers in Takli; Crime against both | टाकळीत आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ; दोघांविरुद्ध गुन्हा

टाकळीत आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ; दोघांविरुद्ध गुन्हा

कोरोना साथीदरम्यान ग्रामीण भागात आरोग्यसेविका व आशा वर्कर्स रुग्णांच्या तपासणीचे काम करत आहेत. रविवारी टाकळी येथे कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाच्या नातेवाईकांची तपासणी करण्यासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून त्यांचे तपासणी साहित्य रस्त्यावर फेकून देण्याचा प्रकार घडला. रुग्णांच्या नातेवाईकांनी या आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. काहीजण अंगावर धावून आले. यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी तक्रार देण्यासाठी ग्रामीण पोलिसांत धाव घेतली. मात्र गावातील काही जणांनी मध्यस्थी करून त्यांना थांबविले.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार दगडू कुंभार यांनी संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. याबाबत आरोग्यसेविका दीपिका स्वप्नील बनसोडे यांनी पोलिसांत तक्रार दिली असून सुमन मधुकर यादव व आकाश यादव यांच्याविरुद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Abusing health workers in Takli; Crime against both