अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:40 IST2020-12-13T04:40:09+5:302020-12-13T04:40:09+5:30

जत : तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून दोघांवर जत पोलिसांत शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात ...

Abuse of a minor girl; Crime on both | अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघांवर गुन्हा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघांवर गुन्हा

जत : तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून दोघांवर जत पोलिसांत शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. सिध्दू काडाप्पा अदाणी (वय २५) व भैरू बसगोंडा बिराजदार (२६, दोघे रा. गुगवाड, ता. जत) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता, १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याबाबत पीडित मुलीच्या नातेवाईकांनी फिर्याद दिली आहे.

संशयित आरोपी सिध्दू अदाणी हा वारंवार पीडित मुलगी गावातून जात असताना तिचा पाठलाग करायचा. वारंवार तिला त्रास देत होता. दरम्यान, गुरुवारी दुपारी भैरू बिराजदार याने कामाच्या निमित्ताने पीडित मुलीला घरी बोलावून घेतले. यावेळी सिध्दू हा देखील तेथे होता. पीडित मुलगी घरात गेल्यावर सिध्दू याने घरात कोणी नसल्याचा फायदा घेत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर ही घटना पीडित मुलीने घरी येऊन आई-वडिलांना सांगितली. त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसात फिर्याद दिली. यावरुन दोघांवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद कांबळे करत आहेत.

Web Title: Abuse of a minor girl; Crime on both