शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

राज्यभरातून सुमारे दीड हजार स्पर्धेक सहभागी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 12:13 IST

सांगली : राजारामबापू चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १४ ते १६ फेब्रवारी या कालावधित राज्यस्तरीय तायक्वॉंदो ...

ठळक मुद्दे१४ ते १६ फेब्रवारी या कालावधित स्पर्धा

सांगली : राजारामबापू चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १४ ते १६ फेब्रवारी या कालावधित राज्यस्तरीय तायक्वॉंदो स्पर्धा आयोजित केल्या आहेत. महाराष्टÑात प्रथमच इलेक्ट्रॉनिक स्कोअरिंग सिस्टिमद्वारे तायक्वांदो स्पर्धा होत आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय पाटील व सुरेश चौधरी यांनी दिली.   

पाटील म्हणाले की, राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील असून तायक्वॉंदो फेडरेशनचे माजी उपाध्यक्ष संजयकुमार शर्मा, राष्ट्रवादीचे सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील, दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते भास्कर करकेरा, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिकराव वाघमारे हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.     

सांगली जिल्हा क्रीडा संकुलात तीन दिवस स्पर्धा चालणार आहेत. सब ज्युनिअर गटात ५ ते ११ वयोगटातील खेळाडू, कॅडेट गटात ११ ते १४ वयोगटातील, ज्युनिअर गटात १४ ते १७ वयोगटातील तर सिनिअर गटात १७ वर्षापुढील खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पदक विजते खेळाडू सहभागी होणार आहेत. राज्यभरातून सुमारे दीड हजार स्पर्धेक सहभागी होणार आहेत.  स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेचे संयोजन सुरेश चौधरी व आनंदराव नलवडे करीत आहेत.अचुकतेसाठी यंत्रणाक्रीडा स्पर्धा म्हटल्या की, वशिलेबाजीचा आरोप अनेकदा होतो. मात्र या आरोपांना अथवा अशा प्रकारांना थाराच मिळणार नाही अशी सोय संयोजकांनी केली आहे. या स्पर्धेत खेळणाºया खेळाडूंच्या पॅडवर सेन्सर बसवले जाणार आहेत. त्यामुळे त्यांना मिळणारे गुण इलेक्ट्रॉनिक सिस्टीमनेच दिले जाणार आहेत. ते थेट स्क्रिनवर दिसणार आहेत. त्यामुळे कोणतीही वशिलेबाजी होणार नाही. अशा पध्दतीच्या स्कोअर बोर्डचा वापर पहील्यांदाच महाराष्ट्रात होत असल्याचे संयोजकांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलMaharashtraमहाराष्ट्र