कनिष्ठ महाविद्यालयांची संचमान्यता रद्द करा;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:03 IST2020-12-05T05:03:17+5:302020-12-05T05:03:17+5:30
प्रा. बिरनाळे म्हणाले, शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील अकरावीच्या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये प्रवेश दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गणना सरलवर दिसत नाही. ...

कनिष्ठ महाविद्यालयांची संचमान्यता रद्द करा;
प्रा. बिरनाळे म्हणाले, शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील अकरावीच्या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये प्रवेश दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गणना सरलवर दिसत नाही. गेल्यावर्षी संचमान्यता स्थगित झाल्याने सरल रेकॉर्ड उपलब्ध नाही. दहावीचा निकाल कमी लागला आहे. अतिरिक्त शिक्षकांची समस्या निर्माण होऊ नये म्हणून २०१९ - २० ची संचमान्यता स्थगित करण्यात आली होती. आता पुन्हा ही संचमान्यता त्या वर्षातील विद्यार्थी संख्येवर घेणे उचित नाही. त्यामुळे राज्यभर गुंतागुंत निर्माण होईल. म्हणूनच २०१९-२० ची तीच परिस्थिती कोरोना संसर्गामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये आहे. यासाठी दोन्ही वर्षाचे संचमान्यता शिबिर घेऊ नये, अशी आमची मागणी आहे. २०१९-२० व २०२०-२१ या दोन्ही वर्षाच्या संचमान्यता रद्द होण्यासाठी शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांना तातडीने आदेश द्यावेत, अशी मागणी शिक्षणमंत्री गायकवाड यांच्याकडे केली आहे.