शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

परदेशी पाहुण्यांच्या हस्ते ‘बाहुबली’ अभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 6:05 AM

सांगली : श्रवणबेळगोळ येथे भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळ्यात बुधवारी ४५० परदेशी पाहुण्यांनी जलाभिषेकात सहभाग घेतला. सांगली, कोल्हापूर, बेळगाव, पुण्यासह महाराष्ट्रातील जैन समाजासाठी २३ रोजी विशेष अभिषेकाचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी एक हजारहून अधिकजण श्रवणबेळगोळकडे रवाना झाले आहेत.भगवान बाहुबली स्वामी यांच्या मूर्तीवर नऊ दिवस मस्तकाभिषेक होणार आहे. १७ फेब्रुवारीपासून या ...

सांगली : श्रवणबेळगोळ येथे भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळ्यात बुधवारी ४५० परदेशी पाहुण्यांनी जलाभिषेकात सहभाग घेतला. सांगली, कोल्हापूर, बेळगाव, पुण्यासह महाराष्ट्रातील जैन समाजासाठी २३ रोजी विशेष अभिषेकाचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी एक हजारहून अधिकजण श्रवणबेळगोळकडे रवाना झाले आहेत.भगवान बाहुबली स्वामी यांच्या मूर्तीवर नऊ दिवस मस्तकाभिषेक होणार आहे. १७ फेब्रुवारीपासून या मस्तकाभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली आहे. बुधवारी अनिवासी भारतीय व परदेशी व्यक्तींसाठी अभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते. युगांडा, दक्षिण अफ्रिका, जर्मनी, इंग्लंड, इस्त्राईल, श्रीलंका, तुर्की अशा विविध देशातून आलेल्या ४० जैनेत्तर लोकांनी अभिषेक केला. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, रशिया, चीन, जपान या देशात राहणाºया ४०० हून अधिक जैन समाजातील भाविकांनी मस्तकाभिषेक केला.कर्नाटक सरकारने उभारलेल्या सभामंडपात या परदेशी पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी महोत्सव समितीच्या अध्यक्षा सरिता जैन, राष्ट्रीय सचिव सुरेश पाटील, विनोद दोड्डणावर, सतीश जैन आदींसह महोत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते. चारुकीर्ती भट्टारक स्वामी यांनीही परदेशी पाहुण्यांना आशीर्वाद दिले. २३ रोजी होणाºया जलाभिषेकासाठी सांगली, कोल्हापूर, बेळगाव, पुणे, नाशिक या परिसरातील १हजारहून अधिकांनी नोंदणी केली.