अभिनंदन पतसंस्थेला २८ लाखांचा ढोबळ नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:24 IST2021-04-12T04:24:19+5:302021-04-12T04:24:19+5:30
आष्टा : येथील अभिनंदन नागरी सहकारी पतसंस्थेची ३१ मार्चअखेर ९६ टक्के कर्जवसुली झाली आहे. संस्थेला ...

अभिनंदन पतसंस्थेला २८ लाखांचा ढोबळ नफा
आष्टा : येथील अभिनंदन नागरी सहकारी पतसंस्थेची ३१ मार्चअखेर ९६ टक्के कर्जवसुली झाली आहे. संस्थेला ढोबळ नफा २८ लाख ५६ हजार इतका झाला आहे, अशी माहिती अध्यक्ष सुहास रूगे यांनी दिली.
ते म्हणाले, सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून पतसंस्थेचा कारभार सुरू आहे. संस्थेचा स्वनिधी २ कोटी, ठेवी ९ कोटी ५३ लाख, कर्जे ७ कोटी ३८ लाख असून गुंतवणूक ४ कोटी ६० लाख इतकी आहे. संस्थेला २८ लाख ५६ हजार इतका नफा झाला आहे. संस्थेने सतत १५ टक्के लाभांश दिला असून ऑडिट वर्ग सतत 'अ' आहे.
सचिव बबन रावळ म्हणाले, संस्थेने सभासद, ग्राहकांच्या विश्वासास पात्र राहून काम केले आहे. समाजातील सर्व घटकांना आर्थिक उभारी देण्याचे काम पतसंस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. अध्यक्ष सुहास रूगे, उपाध्यक्ष सचिन आवटी, सर्व संचालक व महिला सल्लागार मंडळ यांच्या सहकार्याने संस्था प्रगतीपथावर आहे.