शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या शिवसेना जिल्हाप्रमुखपदी अभिजीत पाटील, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 17:19 IST

‘लोकमत’ने १४ जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी अभिजीत पाटील यांची निवड होण्याची शक्यता वर्तविली होती. हे वृत्त खरे ठरले.

सांगली : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सांगली जिल्ह्यातील शिवसेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी मंगळवारी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये जिल्हाप्रमुखपदी आता अभिजीत पाटील यांची निवड करण्यात आली आहे.जिल्ह्यात खानापूर व इस्लामपूर येथील दोन महत्त्वाचे नेते पक्षातून गेल्याने याठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना अधिक संधी देण्यात आली आहे. खानापूर मतदारसंघातून आ. अनिल बाबर तर इस्लामपूरमधील आनंदराव पवार यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. पवार यांच्याजागी आता वाळवा तालुक्यातीलच चिकुर्डे येथील माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील यांना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. दुसरीकडे खानापूर व आटपाडी या दोन्ही तालुक्यात पक्षविस्तार करण्यासाठी शिवसेनेने याठिकाणी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्त केली आहे.नव्या कार्यकारिणीत उपजिल्हाप्रमुखपदी गौरीशंकर भोसले (खानापूर विधानसभा), उपजिल्हा संघटकपदी संतोष पाटील (सांगली विधानसभा), पांडुरंग (दादा), भगत (खानापूर पूर्व), राज लोखंडे (खानापूर पश्चिम तालुका), सुभाष जगताप (आटपाडी पूर्व), मोहन देशमुख (आटपाडी पश्चिम) , नागनाथ मोटे (जत पूर्व), विशाल चव्हाण (पलूस तालुका), तालुका संघटकपदी महेश गव्हाणे (मिरज पश्चिम), सांगली शहर संघटकपदी हरिदास पडळकर, अमोल कांबळे, अरूण बाबर, अभिजित शिंदे यांची तर शहर समन्वयकपदी प्रसाद रिसवडे आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.

‘लोकमत’चे वृत्त खरे ठरले‘लोकमत’ने १४ जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी अभिजीत पाटील यांची निवड होण्याची शक्यता वर्तविली होती. हे वृत्त खरे ठरले.

खानापूर, इस्लामपूरवर लक्ष

जिल्ह्यात खानापूर व इस्लामपूर या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. याठिकाणी पक्षाची नव्याने बांधणी करण्यात येणार असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीShiv Senaशिवसेना