अबब! लाखाचा पाळीव कुत्रा दारी, माणसापेक्षा खर्चास भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:26 IST2021-08-29T04:26:45+5:302021-08-29T04:26:45+5:30

फोटो आहेत...एडिटोरियलवर लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : हौसेला मोल नसते म्हणतात ते खरेच आहे. श्वानांच्या बाबतीत याची प्रचिती सतत ...

Abb! Lakh pet dog door, cost more than man | अबब! लाखाचा पाळीव कुत्रा दारी, माणसापेक्षा खर्चास भारी

अबब! लाखाचा पाळीव कुत्रा दारी, माणसापेक्षा खर्चास भारी

फोटो आहेत...एडिटोरियलवर

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : हौसेला मोल नसते म्हणतात ते खरेच आहे. श्वानांच्या बाबतीत याची प्रचिती सतत येते. अशाच हौसेपोटी, प्रेमापोटी कित्येक देशांचे प्रसिद्ध श्वान लाखो रुपये मोजून जिल्ह्यातील हौसी नागरिकांनी त्यांच्या परिवारात सामील केले आहेत. महिन्याकाठी १० ते ३० हजार रुपयांचा खर्च करतानाही ते चिंता करीत नाहीत.

सांगली जिल्हा हा श्वानप्रेमींचाही जिल्हा आहे. हौसी व व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारचे लोक आहेत. हौसी लोकांनी घरात पाळण्यासाठी किंवा डॉग शोकरिता श्वान खरेदी केले आहेत, तर व्यावसायिकांनी ब्रिडींग करून विक्रीसाठी त्यांची खरेदी केली आहे. सांगली जिल्ह्यात अनेक लोकांनी पाळलेल्या श्वानांचा महिन्याकाठीचा खर्च हा एका कुटुंबासाठीच्या खर्चापेक्षाही अधिक आहे. १० हजारापासून ३० हजार रुपयांपर्यंत या कुत्र्यांच्या संगोपनाचा खर्च येतो. तरीही तो विनातक्रार आनंदाने करणारेही सांगलीकर आहेत.

या कुत्र्यांना आहे सर्वाधिक मागणी

जर्मन शेफर्ड ४,००,०००

सांगलीत एकाकडे ४ लाख रुपये किमतीचा जर्मन शेफर्ड आहे. या श्वानालाही मोठी मागणी दिसून येते. १५ हजारापासून लाखाच्या घरात याच्या किमती आहेत.

ब्रिटिश बुलडॉग १,००,०००

ब्रिटिश बुलडॉगच्या किमती लाखांच्या घरात आहेत. १ लाखापासून ५ लाखापर्यंत याच्या किमती आहेत. या जातीचे अनेक श्वान जिल्ह्यात आहेत.

डॉबरमन १,५०,०००

सांगलीत एका श्वानप्रेमीकडे दीड लाख रुपयांचा डॉबरमन आहे. १५ हजारापासून याच्या किमती सुरू होतात.

फ्रेंच मास्टिफ १,५०,०००

फ्रेंच मास्टिफलाही मोठी मागणी असून, दीड लाखापर्यंत त्याच्या किमती आहेत. स्पर्धेतील श्वानाला सर्वाधिक किंमत मिळते

टिबेटियन मास्टिफ ४,००,०००

भारतीय बाजारात १ लाखापासून २५ लाखापर्यंत या श्वानाच्या किमती आहेत. हौसेखातर लाखो रुपये मोजून सांगलीतही या जातीच्या श्वानांचे पालन केले जात आहे.

कोट

श्वानांच्या किमती निश्चित नसतात. त्यांचे ब्रिडिंग, फादर-मदर चॅम्पियन तसेच कोठून तो खरेदी करण्यात येणार ,यावर अवलंबून असतो. लाखो रुपये खर्चून श्वान खरेदी करणारे प्रेमीही आपल्याकडे आहेत.

- अजित काशिद, श्वानप्रेमी.

कोट

व्यावसाय म्हणून करणारे अनेक जण सांगली जिल्ह्यात असले तरी सोलापूर, कोल्हापूर, पुण्याच्या तुलनेत हौसी श्वानप्रेमींची संख्या सांगली जिल्ह्यात कमी आहे. त्याचे योग्यरीत्या संगोपन करणारे फारच कमी आहेत.

- आदित्य सावंत, डॉग ब्रिडर.

कोट

श्वान हा आमच्या परिवाराचाच भाग आहे. त्याचे मोल किमतीत होऊ शकत नाही. त्यामुळे माणसांप्रमाणेच त्याचे संगोपन आम्ही करतो. - बाळासाहेब कोळी, सांगलीवाडी.

Web Title: Abb! Lakh pet dog door, cost more than man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.