शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात ५८,४९१ विद्यार्थ्यांची आधार क्रमांक नोंदणी अर्धवट, शिक्षक अडचणीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 17:30 IST

'आधारची ऑफलाईन पडताळणी करा'

सांगली : जिल्ह्यातील तब्बल ४० हजार ३४८ विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल पोर्टलवर अवैध ठरले आहेत. १८ हजार १४३ विद्यार्थ्यांनी आधारच काढले नसल्यामुळे एकूण ५८ हजार ४९१ विद्यार्थ्यांमुळे शिक्षक अडचणीत आहेत. विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेच्या पटावर असले तरी शिक्षण विभागाच्या अधिकृत नोंदीत नाहीत. येत्या १५ मेपर्यंत संचमान्यता अंतिम होण्यापूर्वी या विद्यार्थ्यांच्या आधारचे काम न झाल्यास शंभरहून अधिक शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत.जिल्हा परिषद शाळेत पहिली ते आठवीच्या वर्गात चार लाख ३२ हजार ५८ विद्यार्थी संख्या आहे. यापैकी ४० हजार ३४८ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपात्र ठरले. तसेच १८ हजार १४३ विद्यार्थ्यांचे आधारच नाही. संचमान्यता करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने वेळापत्रक दिले आहे. त्यानुसार शाळाना स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करण्यासाठी १५ मेपर्यंत मुदत आहे. ज्या शाळांनी आधार नोंदणी केलेली आहे, तेवढेच विद्यार्थी संचमान्यतेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. या आधार नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या आधारेच शाळांची संचमान्यता होणार आहे.आधार आधारित संचमान्यतेला अनेक शिक्षक व मुख्याध्यापकांचाही विरोध आहे. विद्यार्थ्यांचे शाळेतील नाव, जन्म दिनांक, इतर माहिती आणि आधार कार्डवरील माहिती यात विसंगतीमुळे आधार नोंदणी वेळेत पूर्ण होणार नाही. आधार व त्यावरील चुका दुरुस्ती करण्याचे काम शिक्षक आणि मुख्याध्यापक करत आहेत. पण, ते वेळेत झाले नाही तर अनेक शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका आहे.संचमान्यता आॉफलाईनच करा : कृष्णा पोळआधार क्रमांक लिंक नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या संचमान्यतेत विचारात न घेतल्यास शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे. शाळा प्रवेशासाठीच आधार कार्ड सक्तीचे नसेल तर संचमान्यतेसाठी आधार कार्डची सक्ती शासनाने करू नये, अशी मागणी शिक्षक भारतीचे सरचिटणीस कृष्णा पोळ यांनी केली आहे. संचमान्यता ऑफलाईन पद्धतीनेच केली पाहिजे, अशीही त्यांची मागणी आहे.आधारची ऑफलाईन पडताळणी कराशाळांची पटपडताळणीवर आधारित संचमान्यता करावी, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेची आहे. आधार नसलेले किंवा आधार डेटा मिसमॅच असलेले विद्यार्थ्यांचे प्रमाण एका शाळेत १० ते १५ टक्केच आहे. त्यामुळे तेवढे शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. आधार नसलेले व मिसमॅच असलेल्या विद्यार्थ्यांची आॉफलाईन पडताळणी करावी, अशीही शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी मागणी केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीStudentविद्यार्थीAdhar Cardआधार कार्ड