शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले, सुटी काढून पत्नीला भेटायला आला; मित्रांबरोबर फिरायला गेला अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 19:34 IST

रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

पलूस : येरळा नदीकाठावर मोराळ (ता. पलूस) येथील अंधळी निंबळक बंधाऱ्याखाली फिरायला गेलेल्या तीन मित्रांपैकी एक युवक नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. साईप्रसाद समाधान कदम (वय २३, सध्या रा. पलूस, मूळ गाव मोराळे) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नसल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची शक्यता आहे.मोराळे येथील साईप्रसाद कदम याचे कुटुंबीय कामानिमित्त पलूस येथे वास्तव्यास आहेत. साईप्रसाद हा मुंबई येथील एका हॉटेलमध्ये कामाला असून, तो सध्या सुटीसाठी गावाकडे आला होता. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तो आपल्या दोन मित्रांसोबत मोराळे परिसरात फिरायला गेला. येरळा नदीकाठावर गप्पा मारत असताना व फोटो, सेल्फी काढत असताना नदीतील शेवाळामुळे साईप्रसादचा पाय घसरला आणि तो पाण्याच्या प्रवाहात पडून वाहून गेला. साईप्रसादला पोहता येत नव्हते. त्याच्या दोन मित्रांनाही पोहता येत नसतानाही त्यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवाह प्रचंड असल्याने साईप्रसाद दूरवर असलेल्या पाण्याच्या मोठ्या खड्ड्यात वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच तासगाव व पलूस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आपत्कालीन बचाव पथकाने नदीकाठावर तसेच संबंधित खड्ड्यात शोधमोहीम राबवली; मात्र उशिरापर्यंत साईप्रसादचा शोध लागला नाही.

..अन् काळाचा घालासाईप्रसाद याचे अवघ्या सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. सुटी काढून तो पलूस येथे पत्नीला भेटण्यासाठी आला असताना साईप्रसादवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Newlywed Drowns in River During Vacation Visit to Wife.

Web Summary : A newly married man, Saiprasad Kadam, visiting his wife on vacation, drowned in the Yerla River near Morale, Sangli. He slipped while taking pictures with friends. Rescue efforts were unsuccessful, leaving the community in mourning.