शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: अनैतिक संबंधाच्या संशयावरुन उपाळे मायणीत तरुणाचा भोसकून खून, हल्ल्यात दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 19:12 IST

कडेगाव : उपाळे मायणी (ता.कडेगाव) येथे प्रेमप्रकरणातून राहणारी महिला सोडून गेल्याच्या रागातून तिचा विभक्त पती सागर रायबा पवार (वय-२२, ...

कडेगाव : उपाळे मायणी (ता.कडेगाव) येथे प्रेमप्रकरणातून राहणारी महिला सोडून गेल्याच्या रागातून तिचा विभक्त पती सागर रायबा पवार (वय-२२, रा. उपाळे मायणी) याचा गुप्तीने भोसकून खून करण्यात आला. सागरला वाचवण्यास आलेले दिग्विजय जयवंतराव बल्लाळ (२१) व प्रशांत जयवंतराव बल्लाळ (१७, दोघे रा.उपाळे वांगी,ता.कडेगाव) हे दोघे हल्ल्यात जखमी झाले. रविवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.या खून प्रकरणी कडेगाव पोलिसांनी संशयित सुरज चंद्रकांत माने, मयूर दादासो पडळकर, सौरभ संतोष जमदाडे (सर्व रा.उपाळे मायणी) या तिघावर गुन्हा दाखल केला. तर अन्य एक अल्पवयीन तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तर मारहाणीत दिग्विजय बल्लाळ व प्रशांत बल्लाळ हे दोघे गंभीर जखमी झाले. याबाबत विशाल रायबा पवार (रा.नागाचे कुमठे, ता. खटाव, जि. सातारा) यांनी कडेगाव पोलिसात फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, उपाळे मायणी येथे काल रविवारी (ता.4) रात्रीच्या सुमारास संशयित आरोपी सुरज माने याचे सोबतची महिला निघून गेल्याच्या कारणाचा राग मनात धरुन संशयित आरोपी सुरज माने, मयूर पडळकर, सौरभ जमदाडे व अन्य एक अल्पवयीन तरुण यांनी संगणमत करुन सागर पवार याला येथील शाळेत बोलवून घेऊन त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर संशयित आरोपी सुरज माने याने गुप्तीने सागर पवार याला गुप्तीने भोकसून त्याचा खून केला. दिग्विजय बल्लाळ व प्रशांत बल्लाळ हे भांडणे सोडवण्यासाठी मध्ये गेले असता त्यांना देखील लाथा बुक्क्यांनी मारहाण करून संशयित आरोपी सुरज माने याने दिग्विजय बल्लाळ याचे डावे डोळ्याचे खाली दगड फेकून मारून त्यास किरकोळ जखमी करून धमकी दिली आहे. तर प्रशांत बल्लाळ हाही मारहाणीत जखमी झाला आहे. या घटनेची कडेगाव पोलिसांत नोंद झाली असून अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विटा विभाग विटा विपुल पाटील हे करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस