शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटा बाळगणाऱ्या रुकडीतील तरुणास पाच वर्षे कारावास, सांगली जिल्हा न्यायालयाने सुनावली शिक्षा

By संतोष भिसे | Updated: February 6, 2024 16:59 IST

सांगली : बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी सचिन बाबासाहेब कांबळे (वय २७, रा. रमामाता नगर, आंबेडकरनगर, रुकडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) ...

सांगली : बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी सचिन बाबासाहेब कांबळे (वय २७, रा. रमामाता नगर, आंबेडकरनगर, रुकडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याला पाच वर्षे सश्रम कारावास व ५००० रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. दंड न भरल्यास आणखी १५ दिवस साधी कैद सुनावण्यात आली. सांगली येथील तदर्थ सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. पोतदार यांनी हा निकाल दिला. या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी अण्णा ऊर्फ समीर ऊर्फ मानसिंग यशवंत सावंत फरारी आहे. तर आरोपी मनोहरलाल गोधेजा, विनायक कुंभार,  रायाप्पा गडकरी, सुहास जाधव ऊर्फ युवराज पाटील हे चौघेजण खटला चालू असताना मयत झालेले आहेत.खटल्याची माहिती अशी : १७ सप्टेंबर २०१३ रोजी सकाळी सव्वाआठ वाजता सांगली एसटी स्थानकाच्या गेटजवळ आरोपी सचिन बाबासाहेब कांबळे ५०० रुपये मुल्याच्या बनावट नोटा खपविण्यासाठी आला होता. त्यासाठी त्याने ५०० रुपयांच्या २४ बनावट नोटा गांधीनगर (कोल्हापूर) येथील बबलू ऊर्फ हरेश यांच्याकडून आणल्या होत्या. सांगली शहरात त्या खपविण्याचा त्याचा प्रयत्न होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला बनावट नोटांसह ताब्यात घेतले. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरिक्षक के. जी. घाडगे यांनी केला. तपासाअंती जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे दोन साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकिलांनी सांगितले की, हा गुन्हा समाज विरोधी असून अनेक सर्वसामान्य लोकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षा दिली जावी. गुन्हा शाबित झाल्याने कांबळे याला शिक्षा सुनावण्यात आली. अन्य आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.गुन्ह्याच्या तपासकामी कॉन्स्टेबल प्रकाश डांगे, शशिकांत कलकुटगी, सीमा धनवडे, स्वप्ना गराडे यांनी मदत केली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल ॲड. व्ही. एम. देशपांडे यांनी काम पाहिले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय