शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकातून येणाऱ्या वाहनधारकांना दिलासा!, आता मिरजेत होणार नाही त्रास; पण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 17:40 IST

तपासणी नाक्यावर कर्नाटकातील वाहनधारकांची अडवणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी.

मिरज : मिरजेत कर्नाटकातून येणारी वाहने अडविण्याच्या तक्रारीची दखल घेत नूतन पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी वाहतूक पोलिसांना तपासणी नाके बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे मिरजेत वाहनांनी गजबजलेल्या महात्मा फुले चौकातून वाहतूक पोलीस गायब झाले आहेत.मिरजेजवळ दहा किलोमीटर अंतरावर कर्नाटक सीमाभाग असून, मिरजेतून कर्नाटकत वाहनांची मोठ्या प्रमाणात  ये-जा आहे. परराज्यातून येणारे वाहन असल्याच्या कारणावरून मिरजेत कर्नाटकातील प्रवासी व मालवाहतूक करणारी वाहने अडवून तपासणी करण्यात येते. यासाठी महात्मा फुले चौकात सहा पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले होते. चौकातील तपासणी नाक्यावर कर्नाटकातील वाहनधारकांची अडवणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत.यापूर्वी कर्नाटकातील भाजप पदाधिकाऱ्यांनीही पालकमंत्री सुरेश खाडे यांची भेट घेऊन  मिरजेत पोलिसांच्या त्रासाबद्दल तक्रारी केल्या होत्या. नूतन पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांचे सीमाभागातील रायबाग हे गाव आहे. कर्नाटकातील वाहनधारकांना मिरजेत होणाऱ्या त्रासाची त्यांनाही माहिती असल्याने त्यांनी याबाबतचे आदेश दिले.नवीन जिल्हा वाहतूक शाखा कशासाठी?

  • जिल्ह्यात प्रत्येक शहरात वाहतूक नियंत्रण शाखा व बहुतांश पोलीस ठाण्यांकडे वाहतूक नियंत्रक पोलीस कर्मचारी  आहेत. असे असतानाही जिल्ह्यात नव्याने  जिल्हा वाहतूक शाखेची निर्मिती केली आहे.
  • जिल्हा वाहतूक शाखेचे कर्मचाऱ्यांचे नेमके काम कोणते हे स्पष्ट नाही. यामुळे शहराबाहेर वाहने अडविण्याच्या स्पर्धेत आणखी एका विभागाची वाढ झाली आहे.
  • वाहनधारकांच्या अडवणुकीच्या तक्रारीबाबत  हे काम कोणाचे याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. यामुळे नवीन जिल्हा वाहतूक शाखा कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
  • कर्नाटकातून मिरज शहरात येणारी वाहने अडविणे बंद झाले तरी अद्याप शहराबाहेर थांबून वाहने अडविण्यात येत असल्याचे चित्र आहे.

अवैध वाहतुकीवरच कारवाईमिरजेतील कर्नाटकातील वाहनांच्या तपासणीचे नाके बंद करून अवैध वाहतूक होत असेल तर कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहेत. यामुळे चार दिवसांपासून  महात्मा फुले चौकातील तपासणी नाका बंद असल्याने चौकात वाहनांची गर्दी कमी झाल्याचे चित्र आहे.

टॅग्स :SangliसांगलीKarnatakकर्नाटकPoliceपोलिस