शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

Sangli: तासगाव-विटा महामार्गावर झाड कोसळले, तीन तास वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 15:42 IST

प्रवासी संतप्त : दोन्ही बाजूला दोन किलोमीटर पर्यंत रांगा

तासगाव : तासगाव ते विटा महामार्गावर शिरगाव गावालगत रस्त्यावर सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मोठे झाड पडले आहे. तेव्हापासून तब्बल तीन तास वाहतूक ठप्प आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या हलगर्जीपणामुळे अखेर स्थानिक नागरिकांनीच हे झाड बाजूला काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन किलोमीटरहून लांब रांगा लागल्या असून प्रवासी संतप्त झाले आहेत.सांगली ते विटा महामार्गावर अनेक मोठे वृक्ष आहेत. सततच्या पावसामुळे तासगाव तालुक्यातील शिरगाव हद्दीत मंगळवारी सकाळी  रस्त्याकडील एक मोठा वृक्ष रस्त्यावर कोसळला. सुदैवाने त्यावेळी कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र रस्त्यावर आडवा वृक्ष कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत माहिती कळवली. मात्र तब्बल तीन तास हा वृक्ष बाजूला काढण्यासाठी कोणीच आले नाही. अखेर स्थानिक नागरिकांनीच पुढाकार घेऊन रस्त्यावरील झाड बाजूला काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

सतत रहदारी असणाऱ्या या महामार्गावर, भर रस्त्यावर झाड आडवे पडल्यामुळे, तब्बल तीन तासापेक्षा अधिक काळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन किलोमीटरहून अधिक लांब रांगा लागल्या होत्या.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विरोधात संताप सांगली ते विटा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असतानाच, रस्त्यावर झाड पडलेले काढण्यासाठी तीन तासापर्यंत कोणतीही यंत्रणा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून आली नव्हती. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.

टॅग्स :Sangliसांगलीroad transportरस्ते वाहतूक