शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: शेडबाळ येथे ऊस ट्राॅली पलटली; रस्त्याच्या बाजूने निघालेल्या तीन शेतमजूर महिला ठार

By घनशाम नवाथे | Updated: February 5, 2024 12:07 IST

शिरगुप्पी : शेडबाळ (ता. कागवाड) येथे कागवाडहून उगार साखर कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटल्याने रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या ...

शिरगुप्पी : शेडबाळ (ता. कागवाड) येथे कागवाडहून उगार साखर कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटल्याने रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या तीन शेतमजूर महिला ठार तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. ही दुर्घटना रविवारी दुपारी १२च्या सुमारास घडली. या घटनेची नोंद कागवाड पोलिसांत झाली असून, उपनिरीक्षक एम. बी. बिरादार यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.मृतांत चंपा लखाप्पा तळकट्टी (वय ४२), भारतीय वडराळे (३८), मालू रावसाहेब ऐनापुरे (५३) यांचा समावेश आहे. तर शेकवा नरसप्पा नरसाई (४५) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांची स्थिती चिंताजनक आहे. या घटनेमुळे कागवाड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, कागवाडहून उगार कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर (केए ७१ टी १९२५) ट्रॉलीचे चाक तुटल्याने ती रस्त्यावरून जाणाऱ्या शेतमजूर महिलांवर उलटली. त्यात तिघी ठार व एक गंभीर जखमी झाली.शेतातून काम करून घरी परतताना त्यांना मृत्यूने कवटाळल्याने कागवाड तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. अपघातातील मयत महिला दररोज मजुरीसाठी उन्हाळा असल्याने सकाळी लवकर जाऊन दुपारी बारा वाजता परतत होत्या. घटनास्थळी मृतांच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.अपघाताचे वृत्त समजताच नागरिकांनी तत्काळ जेसीबी मागवून मृतांना बाहेर काढले. अपघातातील तिन्ही मृत महिलांच्या मागे पती, मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातsugarcaneऊसDeathमृत्यू