शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मिरजेत गांजा-नशेच्या गोळ्याचा साठा जप्त, कवठेमहांकाळच्या तरूणास अटक

By घनशाम नवाथे | Updated: April 13, 2024 18:42 IST

सांगली : मिरज रेल्वे स्थानकाजवळील कोल्हापूर उड्डाणपुलाखाली गांजा आणि नशेच्या गोळ्या विक्रीसाठी आलेल्या इ्म्रान उस्मान सनदे (वय ३०, रा. ...

सांगली : मिरज रेल्वे स्थानकाजवळील कोल्हापूर उड्डाणपुलाखाली गांजा आणि नशेच्या गोळ्या विक्रीसाठी आलेल्या इ्म्रान उस्मान सनदे (वय ३०, रा. विजयनगर, महांकाली कारखान्याजवळ, कवठेमहांकाळ) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पकडले. त्याच्याकडून २ लाख ३६ हजाराचा ७ किलो ८६८ ग्रॅम गांजा आणि ६ हजाराच्या नशेच्या ७२० गोळ्या असा एकुण २ लाख ४३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.अधिक माहिती अशी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक निरीक्षक पंकज पवार, कर्मचारी सुनिल जाधव, अभिजीत ठाणेकर, कुबेर खोत पेट्रोलिंग करत असताना त्यांना इम्रान सनदे हा कोल्हापूर उड्डाणपुलाखाली गांजा आणि नशेच्या गोळ्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने पुलाखाली जाऊन पाहणी केली. तेव्हा संशयास्पदरित्या थांबलेल्या इम्रान याला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले. त्याच्या सॅकमध्ये ७ किलो ८६८ ग्रॅम गांजा आणि नशेच्या ७२० गोळ्या आढळल्या. याबाबत पथकाने चौकशी केल्यानंतर त्याने सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. कसून चौकशी केल्यानंतर त्याने गांजा आणि नशेच्या गोळ्या कर्नाटकातील धारवाड येथील जावेद (पूर्ण नाव नाही) याच्याकडून खरेदी करून जादा दराने विकण्यासाठी आणल्याची कबुली दिली. इम्रान याला महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. सहायक फौजदार अनिल ऐनापुरे यांनी त्याच्याविरूद्ध फिर्याद दिली आहे.निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक पवार, कर्मचारी अरूण पाटील, सचिन धोत्रे, अमोल ऐदाळे, प्रकाश पाटील, सुनिल जाधव, रोहन घस्ते, विनायक सुतार, सूरज थोरात, अजय बेंद्रे, श्रीधर बागडी, कॅप्टन गुंडवाडे, स्वप्निल नायकोडे, अजित पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस