शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

लांडग्यांसाठी आटपाडीतील डुबई कुरण राखीव, राज्य शासनाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 14:33 IST

वन्यजीवांचे संवर्धन करताना ग्रामस्थांना व वनक्षेत्राच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेत या नवीन संवर्धन राखीव क्षेत्राची घोषणा करण्यात आली आहे.

सांगली : वन्यजीवांचे संवर्धन होण्यासाठी राज्य शासनाने घोषणा केलेल्या नवीन १८ संवर्धन राखीव क्षेत्रामध्ये आटपाडी तालुक्यातील स्वतंत्रपूर वसाहतीजवळील डुबई कुरणाचा समावेश करण्यात आला आहे. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वन्यजीव मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. डुबई कुरणामध्ये लांडग्यांसाठी संरक्षित क्षेत्र असणार आहे.वन्यजीवांचे संवर्धन करताना ग्रामस्थांना व वनक्षेत्राच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेत या नवीन संवर्धन राखीव क्षेत्राची घोषणा करण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयानुसार राज्यात नवीन १८ व ७ प्रस्तावित संवर्धन राखी क्षेत्रात डुबई कुरणाचा समावेश असून, याचे ९.४८ चौरस किलोमीटर क्षेत्र असणार आहे.आटपाडी तालुक्यात समृद्ध वनसंपदा असून, पाणी टंचाईवेळीही वनक्षेत्र टिकून आहे. आता पाण्याची सोय झाल्याने या तालुक्यात सध्या वनराई बहरत आहे. लांडग्याचा अधिवास शोधून त्यावर अभ्यास करून या क्षेत्रात पुढील कामे होणार आहेत.पर्यटनाला मिळणार संधीजिल्ह्यात सागरेश्वर येथे पर्यटनाचा विकास करण्यात आला आहे. आता डुबई कुरण परिसरातही पर्यटनाच्या दृष्टीने उपाय करण्यात येतील. या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना हॉटेलिंग, पर्यटन वाढीसाठी निधीचीही तरतूद करण्यात येणार आहे. त्यामुळे नेहमीच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आटपाडी तालुक्यात आता पर्यटनक्षेत्र तयार होणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभाग