शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बापरे..! पुजारी मंदिरावरुन मुलांना फेकतो खाली, सांगलीतील 'या' गावातील अघोरी प्रकार- video

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 13:54 IST

पुरोगामी महाराष्ट्रात अघोरी प्रथा कधी बंद होणार?

लक्ष्मण सरगरआटपाडी: २१ व्या शतकात वैज्ञानिक क्रांतीतून देशाची वाटचाल सुरु असताना आजही काही भागात अंधश्रद्धला खतपाणी घालणाऱ्या अनिष्ठ प्रथा सुरु आहेत. काळी जादू, गुप्तधन यासारख्या प्रकारातून अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. असाच काहीसा अघोरी प्रकार सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी येथे आजही सुरु आहे. नवस फेडायच्या भावनेतून मुले मंदिरावरुन खाली सोडायची आणि झेलायची हा धक्कादायक प्रकार आजही सुरू आहे. मुलाच्या आरोग्याशी व आयुष्याशी खेळण्याचा प्रकार निंदनीय आहे.मासाळवाडी येथील महालिंगराया देवाच्या यात्रेत, नवस फेडायच्या भावनेतून मंदिरावरुन पुजारी मुले खाली सोडतो आणि खाली घोंगडीत वरुन सोडलेली मुले पकडली जातात. मंदिराच्या छतावर पुजारी उभा राहून तो त्या लहान मुलांचे दोन्ही पाय आणि दोन्ही हात हे पकडून या मुलाला खाली घोंगडी धरून उभ्या असलेल्या लोकांकडे फेकतो. खाली त्या मुलाला झेलण्यासाठी चार लोक घोंगडी धरून लोक उभे असतात. पण अपघाताने त्या लहानग्याचा जीव जाऊ शकतो याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.अशा पद्धतीने लहान मुलांच्या जीवाशी खेळण्याचा हा अघोरी प्रकार निश्चितच अंगावर शहारे उभा करणारा आहे. दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा या गावात सुरू असून देवाला काही विशिष्ट हेतूने बोललेले नवस फेडण्याच्या उद्देशाने मुलांना असे मंदिरावरून टाकण्याचा दुर्देवी प्रकार सुरू आहे. यात्रा कमिटी, गावचे सरपंच व मंदिर पुजारी यांच्यावर कारवाई झाली तरच आशा प्रथा भविष्यात बंद होतील अन्यथा अशा प्रथेला खतपाणीच घातले जाईल.पुरोगामी महाराष्ट्रात अघोरी प्रथा कधी बंद होणार?पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या या अघोरी प्रथा कधी बंद होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लहान मुलांना मंदिरावरून फेकणे ही अघोरी अंधश्रद्धा आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी श्यामवर्धने यांनी ही परंपरा बंद करून त्याला आळा घातला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी यावर पावले उचलून कारवाई करावी अशी मागणी अनिसने केली आहे. - राहुल थोरात, अंधश्रद्धा निर्मूलन समिती

टॅग्स :Sangliसांगली