शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: कौटुंबिक वादातून वडिलांसह नवविवाहित तरुणाने संपविले जीवन, गावात तर्कवितर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 18:27 IST

नेमक्या कारणाचा शोध

मिरज : सोनी (ता. मिरज) येथे कौटुंबिक वादातून बापाने आत्महत्या केल्यानंतर पाठोपाठ नवविवाहित मुलानेही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. गणेश हिंदुराव कांबळे (वय ५०) व मुलगा इंद्रजित गणेश कांबळे (२२, रा. सोनी, ता. मिरज) अशी मृत बापलेकांची नावे आहेत.सोनी येथील द्राक्ष बागायतदार गणेश कांबळे यांचा एकुलता एक मुलगा इंद्रजित याचा गेल्या महिन्यात विवाह झाला होता. मात्र महिन्याभरापासून घरात कौटुंबिक वाद सुरु होते. वाद विकोपाला जाऊन गणेश यांनी शुक्रवारी सकाळी द्राक्षबागेत जाऊन विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. थोड्या वेळाने तेथे इंद्रजित पोहोचला. वडिलांनी आत्महत्या केल्याचे त्याच्या निदर्शनास आले. इंद्रजित याने वडिलांच्या आत्महत्येची माहिती सर्वांना दिली व मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिकेस पाचारण केले. रुग्णवाहिका आल्यानंतर ग्रामस्थ व नातेवाईक गणेश कांबळे यांचा मृतदेह उचलत असताना इंद्रजित यानेही द्राक्षबागेच्या शेडमध्ये जाऊन विषारी औषध प्राशन केले. औषध प्यायल्याने इंद्रजित याचाही लगेचच मृत्यू झाला. बापलेकाचा मृतदेह एकाच वेळी मिरज शासकीय रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेमुळे सोनी गावावर शोककळा पसरली होती.ही घटना समजताच पोलिस उपअधीक्षक प्राणिल गिल्डा, निरीक्षक अजित सिद यांच्यासह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याबाबत ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आत्महत्येच्या नेमक्या कारणांचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक अजित सिद यांनी सांगितले.

आत्महत्येबाबत गावात तर्कवितर्कगणेश कांबळे यांची अडीच एकर द्राक्षबाग असून गावात तीनमजली घर आहे. काही महिन्यापूर्वीच त्यांनी चारचाकी वाहन घेतले होते. गणेश कांबळे यांना इंद्रजित हा मुलगा व दोन विवाहित मुली आहेत. परिस्थिती सधन असल्याने इंद्रजित याचा विवाहसुद्धा चांगल्या पद्धतीने झाला होता. चार दिवसांपूर्वीच इंद्रजित याची नववधू माहेरी जाऊन सासरी परतली होती. अशातच कौटुंबिक वाद सुरू झाल्याची अशी चर्चा होती.

नेमक्या कारणाचा शोधपोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून आत्महत्येमागच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. रात्री उशिरापर्यंत आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नव्हते.