शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: जनावरांच्या बाजार बंदवरुन वादाला सुरुवात, गोसेवा आयोगाच्या आदेशास सभापतींचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 19:15 IST

त्यांना अधिकार कोणी दिला ? 

मिरज : महाराष्ट्र गोसेवा आयोगाने ३ ते ८ जूनपर्यंत राज्यात सर्व पशू बाजार बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. गोसेवा आयोगाचे आदेश लागू नसल्याची भूमिका बाजार समितीने घेतल्याने यावरुन संघर्ष उभा राहिला आहे. दुसरीकडे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पशू बाजार बंद झाल्यास कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प होण्याची चिन्हे आहेत.राज्य गोसेवा आयोगाने सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना ३ जून ते ८ जूनपर्यंत गोवंशाची बेकायदा कत्तल रोखण्यासाठी जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात कोणत्याही गावात जनावरांचा बाजार भरवू नये, असे आयोगाने परिपत्रकात म्हटले आहे. राज्यात गायी व बैलांच्या कत्तलीवर बंदी घातली आहे. मात्र, आयोगाने या जनावरांसह मेंढ्या, बकरी, म्हैस अशा इतर प्राण्यांच्या बाजारास आठवडाभर बंदी घातली आहे.मिरजेचा मंगळवार व बुधवारी भरणारा जनावर बाजार जिल्ह्यात सर्वात मोठा असून बकरी ईदसाठी बकरी व जनावरे खरेदीसाठी आसपासचे जिल्हे व कोकणातून लोक मिरजेत येतात.आयोगाच्या आदेशाने मिरजेतील जनावर बाजार बंद ठेवणार नसल्याचे बाजार समिती सभापती सुजय शिंदे यांनी स्पष्ट केले. यास सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध करीत सभापती शिंदे यांची भेट घेतली. यामुळे शेतकरी, व संबंधित व्यावसायिकांचे नुकसान होणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.मिरजेतील बाजार बंद केल्यास कर्नाटकातील बाजारात येथील शेतकरी व खरेदीदारांना जावे लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण बाजार बंद ठेवू नये, अशी मागणी मिरजेतील मुस्तफा बुजरूक, मौला कुरणे, युनूस चाबूकस्वार, कामील बागवान यांनी सभापती शिंदे यांच्याकडे केली.

१० कोटीची उलाढालगतवर्षी जूनमध्ये मिरजेत जनावरांच्या बाजारात १० कोटी २९ लाख ५ हजाराची उलाढाल होऊन बाजार समितीला १ लाख ३९ हजार सेस मिळाला होता. यावर्षी २८ मे रोजी बाजारात ४ कोटी ९३ लाख रुपये किमतीच्या जनावरे खरेदी विक्रीपासून ५२ हजार उत्पन्न मिळाले. मंगळवार बाजारात ही मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे.

त्यांना अधिकार कोणी दिला ?गोसेवा आयोग आम्हाला थेट आदेश देऊ शकत नाही. पणन संचालकांचे याबाबत कोणतेही आदेश नसल्याने मिरजेचा जनावरांचा बाजार सुरू राहील. या बाजारात गोवंश विक्रीस प्रतिबंध करण्यात येईल, असे सभापती सुजय शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीAnimalप्राणी