संतोष भिसेसांगली : जिल्हा परिषदेचे राजकारण तापवून महाविकास आघाडीचे सदस्य थंड हवा खाण्यासाठी रवाना झाले आहेत. अध्यक्षपदाची निवड बुधवारी (दि. १८) होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून दगाफटका होऊ नये, याची दक्षता घेताना पक्षनेत्यांनी सदस्यांना अज्ञातस्थळी नेऊन ठेवण्याची दक्षता घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदेसेनेने महाविकास आघाडी किंवा भाजपला पाठिंबा स्पष्ट केलेला नाही. मात्र पक्षाचे दोन्ही सदस्य आघाडीसोबत थंड हवेच्या ठिकाणी शनिवारीच रवाना झाले आहेत.सत्तास्थापनेत भाजपला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी आणि उद्धवसेनेचे सदस्य एकत्र आले आहेत. आणखी एका धक्कादायक घडामोडीत शिंदेसेनेचे आटपाडी तालुक्यातील दोघे सदस्यही आघाडीत सामील होत थंड हवेच्या ठिकाणी रवाना झाले आहेत. शुक्रवारी एका ट्रॅव्हल्समधून सारे सदस्य रवाना झाले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी (शरद पवार)चे जिल्हा पदाधिकारी आणि अजितराव घोरपडे गटाचा मिरज तालुक्यातील एक ज्येष्ठ पदाधिकारी आहे. रविवारी दुपारनंतर साऱ्यांचे मोबाईल स्वीच ऑफ झाले असून, ते संपर्काच्या बाहेर गेले आहेत.सध्या दोन्ही राष्ट्रवादीचे सदस्य एका शहरात थांबून आहेत, तर काँग्रेसच्या सात सदस्यांचा गट समुद्रकिनारी मुक्कामाला आहे. उर्वरित चार सदस्य रविवारी सायंकाळपर्यंत सांगलीतच होते. त्यांनाही अज्ञातस्थळी रवाना होण्याचे आदेश पक्षनेत्यांनी दिले. त्यांच्यासाठी दोन गाड्यांची व्यवस्थाही करण्यात आली. त्यापैकी एका गाडीतून रात्री ते परजिल्ह्यात रवाना झाले आहेत.दरम्यान, शिंदेसेनेने महाविकास आघाडी किंवा भाजपला पाठिंबा स्पष्ट केलेला नाही.मात्र पक्षाचे दोन सदस्य आघाडीसोबत थंड हवेच्या ठिकाणी शनिवारीच रवाना झाले आहेत. शिंदेसेनेच्या पाठिंब्यासाठी भाजपने पाठपुरावा कायम ठेवला आहे. मात्र ‘आम्हाला गृहित धरून तुमचे संख्याबळ ३२ होते हे दाखवून द्या,’ असे आव्हान शिंदेसेनेचे नेते आमदार सुहास बाबर यांनी दिल्याचे समजते. या अटीवरच भाजपचे घोडे अडले आहे.अज्ञातस्थळी असणाऱ्या सदस्यांना बुधवारी थेट जिल्हा परिषदेच्या सभागृहात आणले जाणार आहे. तत्पूर्वी मंगळवारी सायंकाळी त्यांना व्हीप, मतदान, पाठिंबा आदी प्रक्रियेची माहिती दिली जाणार आहे.
अजितराव घोरपडे-जयंत पाटील यांची बैठकअध्यक्ष निवडीचे सारे डावपेच निश्चित करण्यासाठी शनिवारी सायंकाळी राष्ट्रवादी (शरद पवार)चे नेते आमदार जयंत पाटील व राष्ट्रवादी (अजित पवार)चे नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यामध्ये सर्व सदस्यांना अज्ञातस्थळी नेण्याचे निश्चित झाले.
मंगळवारी पक्षश्रेष्ठींची बैठकमहाविकास आघाडीतील पक्षनेत्यांची बैठक मंगळवारी सांगलीत होणार आहे. त्यावेळी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचे डावपेच निश्चित केले जातील. भाजपकडून केल्या जाणाऱ्या संभाव्य डावपेचांचा सामना कसा करायचा? याचीही व्यूहरचना केली जाईल.
सध्या आमचे आघाडीचे सर्व सदस्य बाहेरगावी रवाना झाले आहेत. शिंदेसेनेचे दोघे सदस्यही आमच्यासोबत असून, आमचे एकत्रित संख्याबळ ३८ वर पोहोचले आहे. जिल्हा परिषदेत आमचीच सत्ता येईल, यात कोणतीही शंका नाही. भाजपच्या चुकीच्या राजकारणाला पायबंद घालण्यासाठी आम्ही सारे एकत्र आलो आहोत. - अजितराव घोरपडे, माजी मंत्री
Web Summary : To prevent BJP's win in Sangli ZP election, MVA moved members to an undisclosed location, including two from Shinde's Sena. MVA leaders strategizing for the upcoming election.
Web Summary : सांगली ZP चुनाव में भाजपा को रोकने के लिए, एमवीए ने सदस्यों को अज्ञात स्थान पर स्थानांतरित किया, जिसमें शिंदे सेना के दो सदस्य भी शामिल हैं। आगामी चुनाव के लिए एमवीए नेताओं की रणनीति।