शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

Sangli- पुनवतमध्ये हिंदकेसरी आंधळकर यांचे स्मारक उभारावे, कुस्तीप्रेमींची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 18:47 IST

महाराष्ट्राच्या कुस्तीचा डंका हिंदकेसरी गणपतराव आंधळकर (आबा) यांनी सातासमुद्रापार पोहाेचविला

विकास शहाशिराळा : महाराष्ट्राच्या कुस्तीचा डंका हिंदकेसरी गणपतराव आंधळकर (आबा) यांनी सातासमुद्रापार पोहाेचविला. देश-विदेशातील पहिलवानांना चारीमुंड्या चीत करीत नाव कमावले. एक आदर्श कुस्तीपटू, आदर्श वस्ताद तसेच आदर्श व्यक्तिमत्त्व असलेल्या गणपतराव आंधळकरांचे स्मारक व त्यांच्या कारकिर्दीचा इतिहास सांगणारे वास्तुसंग्रहालय पुनवत (ता. शिराळा) येथे त्यांच्या जन्मभूमीत साकारावे, अशी मागणी कुस्तीप्रेमींमधून हाेत आहे.शेतकरी कुटुंबात जन्मलेले गणपतराव १९५० मध्ये खास कुस्तीसाठी कोल्हापुरात गेले. अपार कष्ट केले. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी हाेत देदीप्यमान कामगिरी बजावली. १९६० मध्ये हिंदकेसरीची गदा पटकावली. पाकिस्तानी मल्ल गोगा पंजाबी, सादिक पंजाबी, जिरा पंजाबी, नसिर पंजाबी, दिल्लीचा खडकसिंग पंजाबी, अमृतसरचा बनातसिंग पंजाबी, पतियाळाचा रोहेराम, लिलाराम, पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, महंमद हनिफ, श्रीरंग जाधव अशा नामवंत मल्लांसाेबतच्या त्यांच्या लढती गाजल्या. १९६२ मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियायी स्पर्धेत त्यांनी सुपर हेवी गटात ग्रीको रोमन स्टाइलमध्ये सुवर्णपदक तर फ्री स्टाइलमध्ये रौप्यपदक पटकावले. १९६४ मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये हेवी गटात भारतीय कुस्ती संघाचे नेतृत्वही त्यांनी केले. या स्पर्धेत त्यांनी चौथ्या फेरीपर्यंत धडक मारली होती. महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांना कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल १९८२ मध्ये शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले. अशा या महान खेळाडूचे स्मारक त्यांच्याच मूळ गावी पुनवत येथे असावे, असे त्यांचे पुतणे दत्ता आंधळकर यांनी  सांगितले.

कुस्ती क्षेत्राशी निगडित असणारे शिराळा तालुक्यातील पुनवत हे महान मल्ल तमाम पहिलवानांचे दैवत हिंदकेसरी गणपतराव आंधळकर (आबा) यांचे गाव आहे. आयुष्यभर कुस्ती आणि लाल मातीची सेवा करणारा, कधीही कुठल्या गोष्टीची अपेक्षा न करणारा, गणपतराव आबांसारखा देखणा पहिलवान पुन्हा महाराष्ट्राला मिळणार नाही. ही कीर्ती कायम ठेवण्यासाठी आबांच्या मूळ गावी त्यांचे स्मारक व्हावे. - चंद्रहार पाटील, डबल महाराष्ट्र केसरी 

हिंदकेसरी गणपतराव आंधळकर यांनी अटकेपार झेंडा रोवला. देशाचे, गावाचे, राज्याचे नाव मोठे केले. ‘कुस्तीगिरांचा पांडुरंग’ असा लाैकिक असलेल्या या महान मल्लाचे स्मारक होणं गरजेचं आहे. शासनाने ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी. - रामदास देसाई, संस्थापक, कुस्ती हेच जीवन, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :SangliसांगलीWrestlingकुस्ती