शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वरातीत झाडल्या रिव्हॉल्व्हरच्या फैरी, तरुणाच्या दंडात घुसली गोळी; सांगलीतील भाटशिरगाव येथील प्रकार 

By श्रीनिवास नागे | Updated: June 29, 2023 17:53 IST

अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला

शिराळा : भाटशिरगाव (ता. शिराळा) येथे लग्नाच्या वरातीत नाचत एकाने रिव्हॉल्व्हरने हवेत गोळीबार केला, मात्र अचानक गोळी सुटून समोर थांबलेल्या तरुणाच्या दंडातून आरपार गेली. यात तो गंभीर जखमी झाला. हृतिक दिलीप इंगळे (वय २३, रा. भाटशिरगाव) असे जखमीचे नाव आहे. काल, बुधवार, (दि. २८) हा प्रकार घडला.याप्रकरणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील सेवानिवृत्त जवान संजय सखाराम देसाई (वय ५२) आणि गोळीबार करणाऱ्या ओमकार भगवान देसाई (२५, दोघे रा. भाटशिरगाव) या दोघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना दि. १ जुलैअखेर पोलिस कोठडी सुनावली.बुधवारी भाटशिरगाव येथील देसाईवस्तीत अवधूत देसाई यांचे लग्न होते. रात्री लग्नाची वरात निघाली. वरात पाहण्यासाठी भाऊ अजय इंगळे व सनी गायकवाड यांच्याबरोबर जखमी हृतिक आला होता. त्यावेळी नाचताना ओमकार देसाई याने केंद्रीय राखीव पोलीस दलातील सेवानिवृत्त जवान संजय देसाई यांच्या कमरेचे रिव्हॉल्व्हर घेत हवेत गोळी उडवली. दुसरी गोळी उडवताना ती सुटून अचानक समोर थांबलेल्या हृतिक इंगळेच्या दंडात लागली. यात तो गंभीर जखमी झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. जखमी हृतिकला तातडीने उपचारासाठी शिराळ्यात उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत हृतिकने शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, हवालदार महेश गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीFiringगोळीबारCrime Newsगुन्हेगारी