शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

Sangli: पळसखेलजवळ पुलाखाली आढळले जिवंत स्त्री अर्भक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 19:12 IST

पुढील उपचारासाठी आटपाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे पाठवण्यात आले

दिघंची : "माणुसकीला हादरवणारी घटना" अशीच एक बाब मंगळवारी दुपारी उघडकीस आली. दिघंचीपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर पळसखेलजवळील आवळाई रस्त्यालगत असलेल्या पुलाखालील पाण्याच्या नळीमध्ये एका दिवसाचे स्त्री जातीचे जिवंत अर्भक फडक्यात गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेने परिसरात खळबळ उडवली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मेंढपाळ आपल्या मेंढ्या चरण्यासाठी माळरानावर गेला असता, त्याच्या कानावर लहान बाळाच्या रडण्याचा आवाज पडला. आवाजाचा मागोवा घेत त्याने पुलाखालील नळीमध्ये पाहिले असता, फडक्यात गुंडाळलेले अर्भक दिसून आले. त्याने तातडीने पळसखेल गावच्या पोलिस पाटील अश्विनी प्रकाश सावंत यांना याची माहिती दिली. पोलिस पाटील सावत यांनी घटनास्थळी धाव घेत आटपाडी पोलिसांना याबाबत माहिती दिली.त्यानंतर अजिनाथ सावत, रोहित सावत, तंटामुक्ती अध्यक्ष बापूराव पाटील, वैभव काळे यांच्या मदतीने अर्भकाला तत्काळ दिघंची प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे डॉ. सावंत यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी आटपाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे पाठवण्यात आले.दरम्यान, या परिसरात वाहतूक अत्यंत कमी असून, माळरान व निर्जन भाग असल्याने ही घटना नियोजनबद्ध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एका निष्पाप अर्भकाला असे बेवारस अवस्थेत टाकल्यामुळे समाजातील विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या दु:खद घटनेचा आटपाडी पोलिस अधिक तपास करीत आहेत. अर्भकाला वाऱ्यावर सोडून देणाऱ्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.