शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली: नेर्लेत महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार, वर्षातील चौथी घटना

By श्रीनिवास नागे | Updated: September 24, 2022 17:28 IST

वाळवा तालुक्यातील महामार्ग परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. वर्षभरात या ठिकाणी चौथ्या बिबट्याचा मृत्यू

सांगली : नेर्ले (ता. वाळवा) येथील राष्ट्रीय महामार्गावर रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ सात महिन्याच्या मादी बिबट्याचा दुचाकी वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना काल, शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली.राष्ट्रीय महामार्गावर रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ पूर्वेकडून पेठच्या बाजूला हा बिबट्या महामार्ग ओलांडत होता. रस्ता ओलांडून जाण्याचा अंदाज नसल्याने रस्ता ओलांडताना बिबट्याला दुचाकीची धडक बसली असावी, असा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. या धडकेत बिबट्या जागीच ठार झाला.वाळवा तालुक्यातील महामार्ग परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. वर्षभरात या ठिकाणी चौथ्या बिबट्याचा मृत्यू झाला आहे. रात्री घटना घडल्यानंतर अपघाताच्या ठिकाणी वनविभागाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृत बिबट्याचे शव ताब्यात घेतले. इस्लामपूर येथे शवविच्छेदन करण्यात आले. हा बिबट्या वयाने लहान असल्याने दुचाकीच्या धडकेत ठार झाल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला. घटनास्थळी वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल सुरेश चरापले, वनरक्षक दीपाली सागावकर, अमोल साठे, प्राणी मित्र युनूस मणेर उपस्थित होते. आधार ऍनिमल रिस्पेक्टचे प्रा. विजय लोहार, बापू कांबळे यांनी वनविभागास माहिती दिली.बेशुद्ध बिबट्याने ठोकली धूमदोन महिन्यापूर्वी याच ठिकाणांहून काही अंतरावर एका बिबट्याला चारचाकी गाडीची धडक बसली होती. परंतु या धडकेत घाबरलेला बिबट्या महामार्गावर तसाच बेशुद्ध पडून होता. पंधरा ते वीस मिनिटांतच हा बिबट्या शुद्धीवर आल्यानंतर तो सुसाट उसाच्या शेतामध्ये पळून गेला होता. त्यावेळी मात्र बिबट्याला बघण्यासाठी आलेल्या अनेकांची भंबेरी उडाली होती.

टॅग्स :Sangliसांगलीleopardबिबट्याAccidentअपघात