तासगाव : पेड (ता. तासगाव) येथील विठ्ठलनगर परिसरात शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अनपेक्षितरीत्या मोठ्या कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्या शिरला. मात्र, नंतर त्याला बाहेर जाता आले नाही. याठिकाणी अडकलेल्या बिबट्यालावनविभागाच्या पथकाने रात्री दोनच्या सुमारास जेरबंद केले.बीड येथील विठ्ठलनगर परिसरात शिवाजी बापू शेंडगे यांच्या घराजवळ कोंबड्यांसाठी मोठा जाळीचा खुराडा करण्यात आला होता. खुराड्यामध्ये हा बिबट्या अडकलेला आढळून आला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
बिबट्या जाळीत अडकल्यानंतर नागरिकांनी गोळा होऊन पत्रे आडवे लावून या खुराड्यातच बिबट्याला अडवून ठेवले. या घटनेनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ कळवण्यात आले. वनविभागाच्या पथकाने रात्री दोन वाजता बिबट्याला जेरबंद केले.तीन महिन्यांपासून होता वावरतब्बल तीन महिन्यांपासून पेड परिसरात बिबट्याचा वावर दिसून येत होता. पंधरा दिवसांपूर्वी पेढे येथीलच एका वस्तीवर वासरू बिबट्याकडून फस्त करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण होते. अखेर शनिवारी हा बिबट्या जेरबंद करण्यात यश आले.