शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘वर्क फ्रॉम होम’च्या आमिषाने सांगलीतील तरुणीची सव्वा तीन लाखाची फसवणूक

By घनशाम नवाथे | Updated: July 10, 2024 17:09 IST

सांगली : ऑनलाईन ऑर्डर घेऊन वस्तू पुरवणाऱ्या कंपनीत ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरी देतो असे सांगून तरुणीची सव्वा तीन लाख रूपयांची ...

सांगली : ऑनलाईन ऑर्डर घेऊन वस्तू पुरवणाऱ्या कंपनीत ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरी देतो असे सांगून तरुणीची सव्वा तीन लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत उजमा अनिस मुजावर (वय २०, रा. मुजावर गल्ली, समडोळी) यांनी संशयित चाहत राजपूत व शिरीन (पूर्ण नाव नाही) रा. गुरगाव (हरियाणा) या दोघांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उजमा मुजावर या बी.कॉम. झाल्या आहेत. संशयित महिला चाहत आणि शिरीन या दोघींनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला होता. त्यांना नोकरी डॉट कॉम द्वारे एका नामांकित कंपनीमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरी देतो असे खोेटे सांगितले. त्यांनी मुजावर यांचा विश्वास संपादन केला. त्यांना नोकरी पूर्वी प्रोसेसिंग फी, लॅपटॉप, डे स्टॉक, ओळखपत्र, कंपनीचे कीट व इतर वस्तू आणि सुरक्षा अनामत अशी कारणे सांगून ऑनलाईन ३ लाख २५ हजार २८० रूपये घेतले. दि. २७ डिसेंबर २०२३ ते ५ जानेवारी २०२४ या दरम्यान हा प्रकार घडला. त्यानंतर मुजावर यांना ‘वर्क फ्रॉम होम’ ची कोणतीही नोकरीची संधी दिली नाही. त्यांनी विचारणा केल्यानंतर दोघी महिलांनी टाळाटाळ केली. मुजावर यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार दोघींविरुद्ध फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगली ग्रामीण पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस