शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: आटपाडीत सिनेस्टाईल हत्यारासह टोळक्याची दहशत

By अशोक डोंबाळे | Updated: April 4, 2024 18:35 IST

शहरात भीतीचे वातावरण : पोलिसांचा वचक नसल्याचे स्पष्ट

आटपाडी : आटपाडी शहरामध्ये मागील दोन दिवसांपूर्वी चारचाकी गाडी अडवून एका युवकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा बदला घेण्यासाठीच मंगळवारी रात्री एका गावातून दोन आलिशान चारचाकीतून आलेल्या सशस्त्र टोळक्याने या युवकावर शोधण्याचा प्रयत्न केला. हल्ल्याचा प्रयत्न झाला. हत्यारांसह टाेळके पाहून थरारक घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांचा फाळकूट दादांवर वचक नसल्याचे दिसून येत आहे.आटपाडी बसस्थानक परिसरात मंगळवारी रात्री दहशतीचा थरार नागरिकांनी अनुभवला. मात्र हल्ला होणार असल्याच्या शक्यतेने युवकांनी अंधाराचा फायदा घेऊन पलायन केल्याने मोठा अनर्थ टळला. बसस्थानक परिसरात वादाच्या घटना वारंवार घडत आहेत. या ठिकाणी महाविद्यालयातील विद्यार्थी बसने ये-जा करत असतात. येथे टवाळखोर युवक सातत्याने दहशत माजविण्याचा प्रयत्न करतात. काही दुकानदार त्यांना आश्रय देत असल्याने त्यांचे फावले आहे.काही दिवसांपूर्वीच बाजारपेठेतील रस्त्याच्या कामावरून कामगारांना मारहाण झाली होती. त्यानंतर टवाळखोरांचा उपद्रव वाढला आहे. शाळा, कॉलेजच्या मुली, महिलांना खेटून दुचाकी चालविणे, वेगाने गाडी पळवणे, अश्लील हावभाव करणे, अश्लील भाषा वापरणे असे प्रकार घडतात. पोलिसांनी याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. बसस्थानक परिसरासह शहरातील सर्वच मुख्य चौकात अशा टवाळखोरांचा त्रास होत आहे.

टोळीचा थरार अनुभवलाबसस्थानकासमोरील एका मोबाइलच्या दुकानामध्ये बसणाऱ्या टोळीचा शोध घेत आलेल्या तरुणांनी तिघांवर प्राणघातक हल्ल्याची तयारी केली होती. सुदैवाने याची चाहूल लागताच तिघा तरुणांनी पलायन केले. याची माहिती आटपाडी पोलिसांना मिळाल्याने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी टोळके वाहनासह पसार झाले.

टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची गरजआटपाडीत गेल्या काही महिन्यांपासून टवाळखोरांची दहशत वाढू लागली आहे. महाविद्यालय सुटण्याच्या वेळेत दादागिरी करत असल्याने महिला व मुलींमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत पोलिसांनी वाहतूक शाखेच्या माध्यमातून जरब बसवण्याची गरज आहे. टवाळखोरांचा बंदोबस्त न केल्यास आटपाडी शहरात दहशतीचे राज्य निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस