शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: चिमुरडीचा अत्याचारानंतर निर्घृण खून, नराधमाने मृतदेह पेटीत टाकला

By घनशाम नवाथे | Updated: February 6, 2025 19:26 IST

खाऊ देऊन तिच्याशी खेळत असल्याचे भासवले

उमदी : करजगी (ता. जत) येथे एका चार वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून केल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास घडली. खुनानंतर नराधमाने बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून लोखंडी पेटीत लपवला होता. याप्रकरणी पांडुरंग सोमनिंग कळ्ळी (वय ४५, रा. करजगी) याला उमदी पोलिसांनी तत्काळ अटक केली. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, करजगी येथे चार वर्षांची चिमुरडी मुलगी आजी- आजोबा सोबत राहत होती, तर तिचे आई-वडील मोलमजुरी करण्यासाठी रत्नागिरी येथे कामाला आहेत. घराशेजारीच पांडुरंग कळ्ळी हा आईसह राहत होता. तो मजुरी करत होता. त्याच्या घरासमोरच बदामाचे झाड आहे. गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास बालिका खेळत-खेळत बदाम घेण्यासाठी पांडुरंगच्या घरासमोर आली. तेव्हा त्याने तिला खाऊ देऊन तिच्याशी खेळत असल्याचे भासवले. त्यानंतर पत्रा शेडमध्ये तिला घेऊन गेला. त्याठिकाणी कोणी नसल्याचे पाहून पांडुरंगने तिच्यावर बलात्कार करून खून केला. खुनानंतर कोणाला प्रकार निदर्शनास येऊ नये म्हणून तिला पोत्यात टाकून मृतदेह लोखंडी पेटीत लपवला.दरम्यान, नात बराच वेळ कुठे दिसत नाही म्हणून तिची आजी विचारपूस करू लागली. चौकशी करताना शेजारील पांडुरंग याने तिला घेऊन गेल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आजी त्याच्या घराकडे गेली. तेव्हा पांडुरंग पत्र्याच्या शेडसमोर झोपल्याचे निदर्शनास आले. त्याला नातीबद्दल विचारणा केली असता माहिती नसल्याचे सांगितले. तसेच त्याने लोकांबरोबर बालिकेला शोधण्यासाठी मदत करण्याचा बहाणा केला. तेवढ्यात काही लोकांनी उमदी पोलिस ठाण्यात चार वर्षीय बालिका बेपत्ता झाल्याचे फोन करून सांगितले होते. उमदी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप कांबळे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बालिकेचा शोध घेत असताना पांडुरंग याच्याबरोबर तिला पाहिल्याचे काहींनी सांगितले. शोधाशोध करताना लोखंडी पेटीमध्ये बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून टाकल्याचे निदर्शनास आले. पांडुरंग याला तत्काळ ताब्यात घेऊन उमदी पोलिस ठाण्यात आणले.बालिकेच्या खुनाची माहिती मिळताच परिसरात गर्दी जमली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जत येथे पाठविण्यात आला.

गावात तणावाचे वातावरणबालिकेवर बलात्कार करून निर्घृण खून केल्याचे समजल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र खळबळ माजली आहे. गावात तणावाचे वातावरण पाहून तातडीने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलिस अधीक्षक रितू खोखर, स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. तसेच उमदी पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्या.

नराधमावर कठोर कारवाई कराबालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून केल्यानंतर तिच्या आजी-आजोबांना धक्का बसला. तत्काळ तिच्या आई-वडिलांना बोलाविण्यात आले. गावात तणावाचे वातावरण आहे. नराधम पांडुरंग कळ्ळी याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

जत बंदची हाकबालिकेच्या खुनानंतर सर्वत्र संतप्त पडसाद उमटत आहेत. करजगी ग्रामस्थांनी शुक्रवारी जत तालुका बंदची हाक दिली आहे. त्यामुळे जत शहरासह करजगी गावात बंदोबस्त ठेवला आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस