शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील शेतकऱ्याचा नादच खुळा, आलिशान मोटारीतून केली भाजीविक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 13:07 IST

लिलावात दर न मिळाल्याने थेट बाजारात लावली मोटार, लिलावातील दरापेक्षा चार पट दर भेटला

लक्ष्मण सरगरआटपाडी : आटपाडीमध्ये शनिवारच्या आठवडा बाजारामध्ये एका तरुण शेतकऱ्याने आपल्या आलिशान मोटारीतून मेथीच्या भाजीची विक्री करत शेतकरी नावाच्या ‘ब्रँड’ची झलक दाखवली. चक्क आलिशान गाडीतून एक तरुण शेतकरी ओरडून मेथीची भाजी विक्री करत असल्याचे पाहून बाजारकरूंनीही भाजी घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.यावेळी नागरिकांनी ‘शेतकऱ्याचा नादच खुळा’ अशा भावना व्यक्त केल्या. शेती परवडत नाही, म्हणून अनेक शेतकरी आपल्या नशिबाला दुषणे देताना दिसतात. मात्र, आपण पिकवलेला माल आपण स्वतः विकला तर त्याला हमखास दर मिळतोच. याचाच प्रत्यय आटपाडी तालुक्यातील झरे गावचे शेतकरी वामन पांडुरंग गोरड यांना आला.शेती करत असताना शेतकऱ्याला अनेक संकटाचा सामना करावा लागतो. पीक घेत असताना असणारे हवामान, मजूर, लहरी निसर्ग याचबरोबर हवामान बदल, पिकावर रोगांचा प्रादुर्भाव, यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. यातूनही पीक व्यवस्थित आले तर सर्वात मोठा धक्का त्याला कष्ट करून पिकवलेला माल बाजारपेठेत विक्रीस नेल्यानंतर मिळालेला भाव पाहून बसतो. उत्पादन खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाही.यावर नामी शक्कल लढवत झरे येथील वामन गोरड या तरुण शेतकऱ्याने आपल्या आलिशान गाडीतूनच भाजी विकण्याचा निर्णय घेतला. आपल्या शेतामध्ये लावलेली मेथीची भाजी लिलावामध्ये नेण्यासाठी लागणारे वाहन भाडे, तसेच लिलावात मिळणारा दर पाहून ते त्रस्त झाले होते. याला पर्याय शोधत त्यांनी थेट स्वमालकीची आलिशान मोटार भाजीच्या पेंड्या भरून शनिवारी आटपाडीच्या आठवडा बाजारात आणली. आटपाडी नगरपंचायतीसमोर मोटार उभी करून मोठ्याने ओरडून भाजी विक्री केली.यातून त्यांना प्रत्येक पेंडीमागे लिलावातील दरापेक्षा चार पट दर भेटला. दरम्यान, आटपाडीच्या बाजारपेठेत प्रथमच अशा प्रकारे आलिशान मोटारीतून भाजी विक्री होत असल्याचे पाहून बाजारकरूंमध्येही कुतूहल निर्माण झाले होते.

 

शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पिकवलेला शेतीमाल लिलावामध्ये विक्री न करता तो थेट ग्राहकास विक्री केल्यास शेतकऱ्यांना तीन ते चारपट दर मिळतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी न लाजता थेट विक्री करावी. - वामन गोरड, शेतकरी, रा. झरे, ता. आटपाडी

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी