शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत मद्यधुंद तरुणाचा इमारतीवर चढून ‘शोले स्टाईल’ आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांसह नागरिकांची तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 22:31 IST

मद्यधुंद अवस्थेतील या तरुणाने कौटुंबिक वादातून हा प्रकार केला. पाऊण तासाहून अधिक वेळ त्याचा हा ‘ड्रामा’ सुरू होता.

सांगली : शहरातील विश्रामबाग येथील हॉटेल पै प्रकाश पाठीमागे असलेल्या एका अपार्टमेंटवर चढून एका तरुणाने शोले स्टाईल आत्महत्येचा प्रयत्न केला. मद्यधुंद अवस्थेतील या तरुणाने कौटुंबिक वादातून हा प्रकार केला. पाऊण तासाहून अधिक वेळ त्याचा हा ‘ड्रामा’ सुरू होता. अखेर पोलिस, अग्निशमन दलाचे जवान व सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने त्याला सुखरूप खाली उतरविण्यात आले. सुनील रतनलाल प्रजापती (वय ३०) असे त्याचे नाव आहे.

गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. विश्रामबाग येथील हॉटेल पै प्रकाशच्या पाठीमागे आर्यन अपार्टमेंट आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रजापती याचा घरी वाद झाल्यानंतर तो अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर चढला. कठड्यावर उभा राहून तो ओरडत होता. विश्रामबाग पोलिसांना ही माहिती मिळताच पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून त्याची समजूत काढत खाली येण्याचे प्रयत्न करण्यात आले. तोवर अग्निशमन दलास याबाबत माहिती देण्यात आली. त्यानुसार जवानही अपार्टमेंटजवळ दाखल झाले. पाऊण तासाहून अधिक काळ त्याचा शोले स्टाईल ड्रामा सुरू होता.

अखेर अग्निशमन दलाचे जवान, पोलिस आणि सामाजिक कार्यकर्ते रवी खराडे त्याच्या नकळत त्याच्याजवळ पोहोचले. त्यांनी त्याला पकडून खाली उतरवले. अग्निशमन दलाचे विजय कांबळे, प्रसाद माने, अभिजित पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला.

रखवालदाराच्या जावयाचा प्रताप -दारू पिऊन धिंगाणा घालणारा सुनील प्रजापती हा याच अपार्टमेंटमध्ये रखवालदार म्हणून काम करणाऱ्या महिलेचा जावई आहे. प्रजापती व त्याची पत्नी तेथेच राहण्यास आहेत. घरगुती वादानंतर दारू पिऊन आल्यानंतर त्याने हा प्रकार केला. 

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिस