शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: दोन अल्पवयीन बहिणींवर अत्याचार; नराधमास मरेपर्यंत सक्तमजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 14:18 IST

एक लाख दहा हजाराचा दंड : विटा येथील न्यायालयात निकाल

विटा : दोन अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवून आरोपी रमेश बाबूराव रणदिवे (वय ४०, रा. दिघंची-भिंगेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) या नराधमास विटा न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश रविकिरण रामकृष्ण भागवत यांनी ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत मरेपर्यंत सक्तमजुरी व एक लाख १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास साध्या कैदेची शिक्षा देण्याचा आदेश केला.आटपाडी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन पीडितेची आई व बहीण दि. २९ ऑक्टोबर २०२१ रोजी शेतात कामाला गेलेली होती. त्यावेळी नराधम रमेश रणदिवे याने अल्पवयीन पीडितेला बोरे आणण्याच्या बहाण्याने शेतात नेले. त्यावेळी पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. ‘आईला सांगितलेस तर तुला जीवे मारीन’ अशी धमकी दिली. त्यानंतर पीडितेला घरी आणून सोडले.दुपारी दीड वाजता पीडितेची आई घरी आल्यानंतर मुलगी जोरजोराने रडू लागली. आईने चौकशी केल्यानंतर नराधम रमेश रणदिवे याने केलेली घटना सांगितली. त्यावेळी पीडितेची दुसरी बहीण तेथेच होती. तिनेही आईला रमेश रणदिवे याने दोन महिन्यांपूर्वी आटपाडी बाजारात जायचे आहे, असे सांगून कॅनॉलजवळ आडोशाला विनयभंग केला. कोणाला सांगितलेस तर जीवे मारीन, अशी धमकी दिल्याचे सांगितले.त्यानंतर दोन्ही अल्पवयीन पीडित मुलींना घेऊन आईने आटपाडी पोलिस ठाणे गाठले. रमेश रणदिवे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी केला. त्यानंतर पोलिसांनी नराधम रमेश रणदिवे यास दि. २९ ऑक्टोबर २०२१ रोजी अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.या खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही पीडितांचा जबाब, पीडितांच्या आईची साक्ष झाली. अल्पवयीन मुली, तिच्या आईचा जबाब एकमेकांशी संगत होता. तसेच पीडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा वैद्यकीय अहवालही सादर करण्यात आला. त्यानुसार विटा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश रविकिरण भागवत यांनी नराधम रमेश रणदिवे यास भादवि कलम ३५४ व ३७६ (२)(एफ), ३७६(३) पोक्सोनुसार दोषी ठरवून मरेपर्यंत सक्तमजुरी व एक लाख १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची सर्व रक्कम अल्पवयीन पीडितेला देण्याचा आदेशही दिला.खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने ॲड. आरती आनंद देशपांडे-साटविलकर यांनी काम पाहिले. त्यांना आटपाडी पोलिस ठाण्याचे हवालदार लक्ष्मण गुरव, राजेश गवळी तसेच सुनिता कांबळे, रेखा खोत, वंदना मिसाळ, सुप्रिया भोसले यांनी सहकार्य केले.अल्पवयीन पीडितांना मिळाला न्याय...दोन अल्पवयीन पीडितेवर दि. २९ ऑक्टोबर २०२१ ला लैंगिक अत्याचार झाला होता. त्याचा खटला विटा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश रविकिरण भागवत यांच्यासमोर सुरू होता. सोमवार, दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी नराधम रमेश रणदिवेला शिक्षा ठोठावली. त्यामुळे दोन्ही अल्पवयीन पीडितांना ४ वर्षे २ महिन्यांनी न्याय मिळाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Crime: Man gets life for abusing two minor sisters.

Web Summary : A Sangli court sentenced Ramesh Randive to life imprisonment for sexually assaulting two minor sisters in 2021. He was also fined ₹1.1 lakh, to be given to the victims. The verdict came after a thorough investigation and witness testimonies.