शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

Sangli: छतावरून पडलेल्या गंभीर बालकाला मिळाले जीवदान, पतंग उडविताना झाला होता जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 13:38 IST

शासकीय रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया : सामाजिक कार्यकर्ते सरसावले

सांगली : पतंग उडविताना छतावरून पडून गंभीररीत्या जखमी झालेल्या अकरा वर्षीय बालकावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने जीवदान मिळाले. सांगली, मिरजेतील सामाजिक कार्यकर्त्यांनीही या मुलावरील उपचारासाठी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरला.सांगली एमआयडीसी भागात राहणारा अकरा वर्षीय शाळकरी मुलगा घराच्या छतावर पतंग उडवित होता. तोल जाऊन पहिल्या मजल्यावरून तो खाली पडला. त्याच्या डोक्याच्या आतील भागात गंभीर इजा झाली होती. सिटीस्कॅन केल्यानंतर त्याच्या डोक्यात रक्तस्राव झाल्याचे स्पष्ट झाले. १५ मि. मी.ची एक रक्ताची गुठळी तयार झाली होती.हातावरचे पोट असणाऱ्या या मुलाच्या कुटुंबीयांनी सांगली, मिरजेतील अनेक तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवले. मात्र, शस्त्रक्रियेसाठी अडीच ते तीन लाख रुपयांचा खर्च त्यांना सांगण्यात आला. इतका मोठा खर्च ते करू शकत नव्हते. त्यामुळे हे कुटुंब हतबल व चिंताग्रस्त बनले. मुलाच्या एका नातेवाइकाने सामाजिक कार्यकर्ते अजहर सय्यद यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर सय्यद यांनी याची कल्पना सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आयुब बारगीर यांना दिली. बारगीर यांनी मुलाचे सर्व वैद्यकीय अहवाल घेऊन शासकीय रुग्णालयातील डॉ. अभिनंदन पाटील यांचा सल्ला घेतला. त्यांनी आठ दिवसांचे औषध देऊन निरीक्षण केले. त्यानंतर पुन्हा सिटीस्कॅन केल्यानंतर मेंदूतील रक्ताची गुठळी तशीच असल्याचे दिसून आले. त्यामुळे सर्जरी करणे आवश्यक होते. त्यानुसार चार दिवसांपूर्वी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात या मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.

पदाधिकाऱ्यांकडून डॉक्टरांचे कौतुकराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष संगीता हारगे, शहर जिल्हा उपाध्यक्ष विजय माळी, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष आयुब बारगीर, इर्शाद पखाली, अजहर सय्यद, सामाजिक कार्यकर्ते राहील मुल्ला, वाहिद खतिब यांनी मुलाच्या प्रकृतीची चौकशी करून यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचे कौतुक केले.

पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तेरा वर्षांपासून आम्ही महाआरोग्य शिबिरातून सेवा देत आहोत. सांगलीतील बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्याने आम्हाला आनंद झाला. आमच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाकडे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे व मेंदू शल्यचिकित्सक डॉ. अभिनंदन पाटील व त्यांचा सर्जरी स्टाफ यांची भूमिका महत्त्वाची होती. - आयुब बारगीर, सामाजिक कार्यकर्ते सांगली.

टॅग्स :Sangliसांगली