शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मिरजेत अंगावर भिंत कोसळून बांधकाम कामगाराचा मृत्यू, दोघे जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 13:18 IST

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी

मिरज : शहरातील लोणी बाजारात इमारतीचे बांधकाम सुरू असताना अचानक भिंत कोसळून तम्मान्ना कांबळे (वय ५०, रा. ऐनापूर, ता. अथणी) या बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. तर विटा व मातीखाली गाडले गेल्याने दोन कामगार गंभीर जखमी झाले.लोणीबाजारात मिरज हिंदमाता चौकात सकाळी ११ वाजता ही घटना घडली. जखमींना मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तम्मान्ना कांबळे याच्यासह तिघे कामगार विटाच्या भिंतीचे बांधकाम करीत असताना अचानक भिंत पडून विटा, मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. तम्मान्ना कांबळे याच्यासह सिद्धप्पा पुजारी (वय ३५, रा. खाजा बस्ती, मिरज) व धोंडीराम लांडगे (४६, रा. राजीव गांधी नगर, मिरज) या तिघांना गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तम्मान्ना कांबळे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अन्य दोघे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

हिंदमाता चौकात चार मजली नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम ठेकेदाराने रोजंदारीवर कामास आणलेले आठ मजूर सेंट्रिंग व बांधकाम करीत होते. यावेळी नवीन बांधलेली १५ फूट उंच भिंत अचानक कोसळल्याने तिघे जण त्याखाली गाडले गेले. मृत तम्मान्ना कांबळे याची परिस्थिती हलाखीची असून, तो दररोज सकाळी कामाच्या शोधात कर्नाटकातून मिरजेत येत होता. सिद्धप्पा पुजारी व धोंडीराम लांडगे हे दोघे जखमी कामगारही रोजंदारीवर मिळेल ते काम करीत होते. बांधकाम ठेकेदाराने नवीन भिंत बांधताना आवश्यक काळजी घेतली नसल्याने ही दुर्घटना घडल्याची चर्चा होती. याबाबत शहर पोलिसात नोंद असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणीबांधकाम करताना सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या नसल्याने अर्धवट बांधकाम कोसळून तम्मान्ना कांबळे या कामगाराचा मृत्यू झाला तर अन्य दोन कामगार गंभीर जखमी झाले. या मिळकतीचा मालक व ठेकेदार घटनेला जबाबदार असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची व मृत कामगाराच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी मिरज सुधार समितीने पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजDeathमृत्यू