शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वयोवृद्ध वडिलांना उपाशी ठेवले; मुलाविरोधात गुन्हा दाखल; सांगली जिल्ह्यातील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 18:01 IST

प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्षित करत उलट त्याने वडिलांना घराबाहेर काढण्याची धमकी दिली

आटपाडी : वयोवृद्ध पित्याला जेवण न देणे, वैद्यकीय खर्च न करणे आणि मानसिक त्रास देत घराबाहेर काढण्याची धमकी देणाऱ्या मुलाविरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना राजेवाडी (ता. आटपाडी) येथील नाना दशरथ शिरकांडे (वय ७६) यांच्याबाबतीत घडली.नाना शिरकांडे यांनी आपला मुलगा कृष्णा नाना शिरकांडेविरोधात प्रांताधिकारी विटा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, मागील दोन वर्षांपासून मुलगा कृष्णा वडिलांकडे दुर्लक्ष करत असून त्यांना जेवण न देणे, औषधोपचार खर्च टाळणे आणि सतत मानसिक त्रास देणे असे त्याचे वागणे आहे. या तक्रारीवर सुनावणी करत प्रांताधिकारी विटा यांनी १४ जून २०२५ रोजी आदेश काढून मुलास वडिलांना दरमहा ३ हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, हा आदेश दुर्लक्षित करत मुलाने एकही रुपया वडिलांना दिला नाही, उलट त्याने वडिलांना घराबाहेर काढण्याची धमकी दिली. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत ‘ज्येष्ठ नागरिक व पालकांचे पालनपोषण व कल्याण अधिनियम २००७’ मधील कलम २४ तसेच भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३५३(२) आणि ३५१(३) अंतर्गत कृष्णा शिरकांडे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे राजेवाडी परिसरात संताप व्यक्त केला जात असून वृद्ध पालकांच्या संरक्षणासाठी कडक कारवाईची मागणी होत आहे.