शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मरणानंतरही सरेना भ्रष्ट व्यवस्थेचा प्रवास, सांगली जिल्ह्यात "पोस्टमार्टम"लाही लाचखोरीचा वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 17:01 IST

दत्ता पाटील  तासगाव : अपघातापासून आत्महत्येपर्यंत अनेक कारणांनी मृत्यू झाल्यानंतर कायदेशीर सोपस्कारांसाठी मृतदेहाचे विच्छेदन अनिवार्य असते. ज्यांची दोन वेळची ...

दत्ता पाटील तासगाव : अपघातापासून आत्महत्येपर्यंत अनेक कारणांनी मृत्यू झाल्यानंतर कायदेशीर सोपस्कारांसाठी मृतदेहाचे विच्छेदन अनिवार्य असते. ज्यांची दोन वेळची खायची भ्रांत आहे, अशा कुटुंबीयांसाठी शवविच्छेदनाची भ्रष्ट व्यवस्था पाहिल्यावर मृत्यू स्वस्त आणि शवविच्छेदन महाग असल्याची भावना होत आहे. भ्रष्ट व्यवस्था आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता यामुळे जिल्ह्यात मृत्यूनंतरची परवड नातेवाइकांचा अंत पाहणारी ठरत आहे. अपवाद वगळता जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी दोन ते पाच हजार रुपये मोजावे लागतात. त्यामुळे ''मरणानंतरही सरेना भ्रष्ट व्यवस्थेचा प्रवास; जिल्ह्यात पोस्टमार्टमलाही येतो लाचखोरीचा वास'' असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या भ्रष्ट व्यवस्थेचेच पोस्टमार्टम करण्याची मागणी होत आहे.सांगली जिल्ह्यात दोन्ही जिल्हा रुग्णालयांसह ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालये मिळून १५ ठिकाणी शवविच्छेदन केले जाते. ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत मृत्यू होतो, त्याच हद्दीतील रुग्णालयात शवविच्छेदन होते. मात्र, भ्रष्ट व्यवस्थेमुळे मरणानंतर सरणापर्यंतचा प्रवासही भ्रष्टाचारानेच बरबटलेला असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. जिथे खासगी व्यक्ती शवविच्छेदन करते, तिथे दोन ते पाच हजार रुपये घेतले जातात. पैशांचा दर ठरल्याशिवाय शवविच्छेदन होत नाही. जिथे शासकीय सेवेतील कर्मचारी शवविच्छेदन करतात, तेथेदेखील चिरीमिरी दिल्याशिवाय शवविच्छेदन केले जात नाही. अशा ठिकाणी पाचशे ते दोन हजार रुपये घेतले जात असल्याची चर्चा आहे. चिरीमिरी नसेल तर नातेवाइकांना शवविच्छेदनासाठी ताटकळत बसावे लागते.

पोस्टमार्टमच्या व्यवस्थेने मृत्यूही ओशाळलाकाही दिवसांपूर्वी तासगाव येथील सामान्य कुटुंबातील एका तरुणाने आत्महत्या केली. वृद्ध आई-वडील, इतर कोणाचाही आधार नाही. अशा तरुणाची आत्महत्या झाल्यानंतर त्याचे शवविच्छेदन तासगाव ग्रामीण रुग्णालयात केले. मात्र, शवविच्छेदन करणाऱ्या खासगी व्यक्तीने नातेवाइकांकडून दोन हजार रुपये घेतले. आणखी एका घटनेत उदरनिर्वाहासाठी उत्तरांचलमधून मजुरीसाठी आलेल्या एका कामगाराने आत्महत्या केली. त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी आष्टा येथील रुग्णालयातील कर्मचारी आला. त्याने नातेवाइकांकडून शवविच्छेदनासाठी साडेतीन हजार रुपये घेतले. जिवंतपणी आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्या केलेल्या तरुणाच्या नातेवाइकांकडून शवविच्छेदनासाठी घेतलेल्या लाचेने मृत्यूही ओशाळला जावा असे चित्र आहे.

पोस्टमार्टम होणारी जिल्ह्यातील ठिकाणे जिल्हा रुग्णालये - सांगली, मिरजजिल्हा उपरुग्णालये - शिराळा, कवठेमहांकाळ, इस्लामपूरग्रामीण रुग्णालये - कोकरूड, वांगी, जत, करंजे, पलूस, तासगाव, कडेगाव, आटपाडी, विटा, आष्टा.

निम्म्या ठिकाणी खासगी नियुक्त्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १३ पैकी सात ठिकाणी शवविच्छेदनासाठी खासगी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आटपाडी, आष्टा, जत, पलूस, तासगाव या ग्रामीण रुग्णालयांत आणि इस्लामपूर, कवठेमहांकाळ या जिल्हा उपरुग्णालयांत शवविच्छेदनाची भिस्त खासगी व्यक्तीवर असून, या ठिकाणी दोन ते पाच हजार रुपये मोजावे लागतात.

टॅग्स :Sangliसांगलीhospitalहॉस्पिटल