शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तकांचे रुखवत, विज्ञानवादी विचारांचा जागर; सांगलीत पार पडला सत्यशोधक विवाह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 17:39 IST

सांगली : अन्न-धान्याची नासाडी टाळण्यासाठी तांदळांऐवजी फुलांच्या अक्षता, किमती भेटवस्तूंऐवजी प्रगतीशील विचारांच्या पुस्तकांचे रुखवत सजवून, विज्ञानवादी विचारांचा जागर अन् ...

सांगली : अन्न-धान्याची नासाडी टाळण्यासाठी तांदळांऐवजी फुलांच्या अक्षता, किमती भेटवस्तूंऐवजी प्रगतीशील विचारांच्या पुस्तकांचे रुखवत सजवून, विज्ञानवादी विचारांचा जागर अन् प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करीत सांगलीत सत्यशोधक विवाह पार पडला.  बिसूर येथील सुभाष सदाशिव पाटील यांची कन्या संपदा व मिरज तालुक्यातील करोली (एम) येथील अभियंता अतुल काकासाहेब पाटील यांचे पुत्र अभिनव यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह झाला. संविधान सोबत घेऊन वधू-वरांचे आगमन झाले. घटनेतील प्रास्ताविकेचे वाचन, स्वातंत्र्य आणि समानतेच्या वागणुकीची शपथ घेत दोघांनी एकमेकांना जीवनसाथी म्हणून स्वीकारले. तुताऱ्यांच्या निनादात वधू-वरांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केले. आंब्याच्या रोपाला पाणी घालून वृक्षारोपणाचा संदेश दिला. डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी विज्ञानवादी विचारांसह जगण्याचे आवाहन केले. डॉ. विजय गायकवाड यांनी सत्यशोधक विधी केले. ए. डी. पाटील, धोंडीराम पाटील यांनी संयोजन केले. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, डॉ. जितेश कदम, डॉ. संजय पाटील, प्रणिता पवार, अनंत सावंत, सुभाष सावंत, जयवंत सावंत, संभाजी पोळ, राहुल थोरात, प्रा. प्रताप पाटील, प्रा. नंदा पाटील उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीmarriageलग्न