शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आले पिकाच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची डोकदुखी वाढली, कंदकुजमुळे उत्पादनही घटले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 12:46 IST

विक्रीसाठी व्यापाऱ्यांना साकडे

प्रताप महाडिककडेगाव : कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आता आर्थिक संकट उभे ठाकले आहे. आले पिकाच्या दरात मोठी घट झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठीदेखील संघर्ष करावा लागतो आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यात आले उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असताना मागील महिन्यापासून आल्याच्या दरात सुरू झालेली घसरण शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे.सध्या आले पिकास प्रतिगाडी (५०० किलो) १२ ते १५ हजार रुपये दर मिळत आहे, जो मागील महिन्याच्या तुलनेत निम्म्याहून कमी आहे. मागील दोन वर्षांमध्ये आले उत्पादक शेतकऱ्यांना १०० ते १२५ रुपये किलो दर मिळत होता. त्यामुळे आले लागवड योजना मोठ्या प्रमाणावर वाढली. यावर्षी दमदार पाऊस झाल्यामुळे शेतात पाणी साचल्याने कंदकुज सुरू झाली.यामुळे एकूण लागवडीच्या ३० ते ३५ टक्के आले पिकाचे क्षेत्र बाधित झाले. शेतकऱ्यांनी आले टिकवण्यासाठी औषध फवारणीसह सर्व प्रयत्न केले. यामुळे त्यांचा खर्चही वाढला आहे. दरातील घट आणि कंदकुजमुळे शेतकऱ्यांना आले लवकर काढावे लागत आहे.व्यापारी कमी दरात आले विकत घेत आहेत. काही व्यापाऱ्यांनी तर खरेदी बंद केली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन आले खरेदी करणारे स्थानिक व्यापारी आवक वाढल्याने दर कमी झाल्याचे शेतकऱ्यांना सांगत आहेत. मात्र, हा आले दर कमी करण्यासाठीचा नियोजनबद्ध कार्यक्रम असल्याची शेतकरी वर्गात चर्चा आहे. दर घसरल्याने शेतकरी मात्र कर्जाच्या ओझ्याखाली दबले जात आहेत.कंदकुज आणि उत्पादन घटशेतकरी कंदकुज सुरू झालेले आले पीक जास्त दिवस जमिनीत ठेवू शकत नाहीत. त्यामुळे कंदकुजपासून वाचलेला चांगला माल काढून मिळेल त्या दरात विकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. शेतकऱ्यांची ही व्यथा आहे.कृत्रिम दर घटआले पिकाच्या दरात झालेली घट ही कृत्रिम असल्याची शंका शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी बंद केली आहे आणि काही व्यापाऱ्यांकडून दर कमी करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबविला जात असल्याची शेतकऱ्यांत चर्चा आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीMarketबाजार