शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: जनावरांच्या आठवडी बाजाराबाबत प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

By अशोक डोंबाळे | Updated: January 6, 2023 18:48 IST

लम्पी त्वचारोगाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या आठवडी बाजारावर होती बंदी

सांगली : लम्पी त्वचारोगाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या आठवडी बाजारावर बंदी होती. लसीकरणासह अन्य अटींचे पालन करण्याच्या हमीवर शेळ्या-मेंढ्या, म्हैसवर्गीय जनावरांच्या यात्रा, आठवडा बाजारावरील निर्बंध हटविण्यात आले आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.जितेंद्र डुडी म्हणाले, जिल्ह्यांतर्गत वाहतूक करावयाच्या गुरांचे लम्पी चर्मरोगाकरिता २८ दिवसांपूर्वी प्रतिबंधक लसीकरण झालेले असणे गरजेचे आहे. वाहतूक करावयाच्या गुरांची आणि म्हशींची ओळख पटविण्यासाठी कानात टॅग नंबर असणे, इनाफ पोर्टलवर नोंदणी असणे आवश्यक आहे. वाहतूक करताना विहित प्रपत्रामधील आरोग्य दाखला आणि स्वास्थ्य प्रमाणपत्र वाहनचालकाकडे असले पाहिजे. म्हशीचा आठवडी बाजार भरण्यापूर्वी व नंतर संपूर्ण परिसरात जंतूनाशक व कीटकनाशक औषधाची फवारणी आयोजकांनी करणे बंधनकारक आहे. आठवडी बाजार परिसरात फक्त कानात टॅग मारलेल्या म्हैसवर्गातील जनावरांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. जनावरांची यादी संबंधित पशुपालकांच्या नावासहीत (टॅग नंबरसह) पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती यांना त्याच दिवशी देणे बंधकारक आहे. तसेच संक्रमित असलेल्या व नसलेल्या क्षेत्रातून गुरांची, म्हशींची वाहतूक करण्यासाठी आवश्यक ते आरोग्य प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य शासन आणि जिल्हा परिषदेकडील पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी गट-अ पेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकारी यांना सक्षम अधिकारी म्हणून प्राधिकृत केले आहे.गायवर्गीय जनावरांना बाजारात बंदीगेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात जनावरांच्या आठवडा बाजारावर निर्बंध होते. तीन महिन्यांनंतर जनावरांच्या आठवडा बाजारावरील निर्बंध उठविले आहेत, पण गायवर्गीय जनावरांच्या आठवडा बाजारावर निर्बंध कायम असणार आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीLumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग