शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात मराठा समाजाचे ९९ टक्के सर्वेक्षण पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 13:24 IST

सर्वेक्षणाची माहिती आज राज्य मागासवर्ग आयोगाकडे

सांगली : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी जिल्ह्यात तीन लाख ९९ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत तीन लाख ८० हजार कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. त्याचे प्रमाण ९९ टक्के असून, रात्री बारा वाजेपर्यंत सर्वेक्षणाचे काम सुरूच राहिल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. एकत्रित सर्वेक्षणाची माहिती राज्य मागासवर्ग आयोगाकडे शनिवारी सादर करण्यात येणार आहे.राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार राज्यात मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. जिल्ह्यात पाच हजार प्रगणकांची नेमणूक केली असून त्यांच्यामार्फत सर्वेक्षणाचे काम सुरू झाले. प्रारंभी ॲपमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र त्यानंतर काम गतीने करण्यात आले. रात्री दहा वाजेपर्यंत प्रगणकांकडून कामकाज सुरू राहिले. जिल्ह्यातील तीन लाख ९९ हजार कुटुंबांच्या सर्वेक्षणाचा अंदाज होता. मात्र, त्यापेक्षा जादा सर्वेक्षण होण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी संध्याकाळपर्यंत तीन लाख ८० हजार कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात ९९ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले असले, तरी रात्री बारा वाजेपर्यंत कुटुुंबांचे सर्वेक्षणाचे काम सुरूच राहिले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी सांगितले. मराठा मागासलेपणाचा सर्वेक्षण सात दिवसांत म्हणजे, ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना होत्या. तांत्रिक अडचणींमुळे या कालावधीत काम पूर्ण होणार नसल्याने दोन दिवस मुदत वाढवून देण्यात आली होती. त्याची मुदत शुक्रवारी संपली.जिल्ह्यातील प्रगणकांकडून रात्री उशिरापर्यंत करण्यात आलेल्या सर्वेक्षणाची आकडेवारी शनिवारी सर्व तालुक्यातून जिल्हा प्रशासनांकडे जमा होईल. त्यानंतर एकत्रित सर्वेक्षणाची माहिती राज्य मागासवर्ग आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीMaratha Reservationमराठा आरक्षण